Ticker

6/Breaking/ticker-posts

पत्रकार नीळकंठ कराड अनंतात विलीन

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव : पत्रकार नीळकंठ उर्फ गणपत भगवानराव  कराड (वय-५९) यांचे शुक्रवार  दि.१८ ऑगस्ट   रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.   त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले बंधु भगिनी असा मोठा परीवार आहे


स्व. कराड यांनी दैनिक गावकरी, सामना, केसरी, लोकमतसह विविध वृत्तपत्रांत अनेक वर्षे वार्तांकन केले.  तत्पूर्वी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे,  अॅड.  प्रतापराव ढाकणे यांच्या बरोबर राजकीय क्षेत्रातही काम केले. त्यांनी काही काळ केदारेश्वर सह. साखर कारखान्याचे प्रसिद्धी व काही काळ तज्ज्ञ संचालकपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. तसेच महाराष्ट्र पत्रकार परिषदेचे कार्यकारिणी  सदस्य  म्हणून ते कार्यरत होते. दिलखुलास आणि अत्यंत बोलक्या स्वभावामुळे ते सर्व परिचित होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण  तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

त्यांच्या पार्थिवावर  शेवगांव अमरधाम येथे शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार  करण्यात आले.  यावेळी तालुक्यातील पत्रकार,  राजकीय,  सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या