श्रीमार्कंडेय देवस्थान कमिटी व पद्मशाली समाज बांधवांच्या वतीने बोज्जा यांचा सत्कार
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर: घरात वडिलांच्या रूपाने सामाजिक कार्याचा वारसा घेऊन गेल्या तीन दशकांहुन अधिक काळ शैक्षणिक, सामाजिक, अध्यात्मिक, राजकीय व संघटनात्मक कामात सक्रिय असणाऱ्या श्रीनिवास नाना बोज्जा यांना आझादी का अमृत महोत्सवातंर्गत दिल्ली सरकारच्या ओबीसी आयोगाकडून मिळालेला ‘राष्ट्रीय एकता पुरस्कार’ म्हणजे पद्मशाली समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे, असे गौरोद्गार राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम यांनी काढले.
येथील विश्व निर्मल फौंडेशनचे अध्यक्ष व अहमदनगर फटका असोसिएशनचे अध्यक्ष, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांना राजधानी नवी दिल्लीतील कॉन्सीटीट्यूशन क्लबमध्ये बोज्जा यांना नुकतेच राष्ट्रीय एकता पुरस्काराने सन्मानीत केल्याबद्दल त्यांचा श्री मार्कंडेय देवस्थान कमिटी व पद्मशाली समाज बांधव यांच्या वतीने मार्कंडेय मंदिरम येथे शाल , श्रीफळ, पुष्पगुच्छ व मनाचा फेटा देऊन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मंगलारम, उपाध्यक्ष त्रिलेश येनगंदुल, सचिव कुमार आडेप व इतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात मंगलारम बोलत होते.
"श्रीनिवास बोज्जा यांनी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सामाजिक कार्याबरोबरच शैक्षणिक व आध्यत्मिक भरीव काम केले आहे व करीत आहे. विश्व निर्मल फौंडेशन शैक्षणिक संस्थेचे वतीने बोल्हेगाव भागातील गरीब विदयार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने शाळा सुरु करून अत्यंत कमी फी मध्ये सर्व सुविधा विदयार्थ्यांना प्राप्त करून दिली. तसेच अध्यात्मिक गुरु प. पु. माताजी श्री निर्मलादेवी यांच्या कृपा आशीर्वादाने सहजयोग या अध्यात्मिक परिवारात काम करत असून अहमदनगर जिल्ह्याचे समन्वयक म्हणून काम पहात आहेत.
तसेच व्यवसायिक क्षेत्रात काम करीत असतांना दि अहमदनगर फटाका व्यापारी असो. चे अध्यक्ष अनेक वर्षे जबाबदारी पार पाडत आहेत.
राजकीय क्षेत्रात काम करीत असतांना पत्नी सौ. वीणा बोज्जा यांना नगरसेविका करून प्रभागामध्ये चांगले कार्य करून त्यांना राज्यस्तरीय बेस्ट नगरसेविका अवार्डही प्राप्त झाले आहे. या सर्व उपक्रमाची दखल घेत बोज्जा यांचे सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक व राजकीय कार्याचा विचार करून त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाला, निवडही अपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.…!!" असे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मंगलारम म्हणाले.
"समाजाच्या विविध घटकात उल्लेखनिय कार्य करणार्या देशभरातील फक्त साठ व्यक्तींचा सन्मान दिल्ली सरकारच्या ओबीसी आयोगाकडून केला गेला आहे. त्यात आपल्या अहमदनगर शहरातून एकमेव सत्कार हा आपल्या समाज बांधवांचा होतो ही अभिमानाची बाब आहे. दर गुरुवारी गजानन महाराज आरती व महाप्रसादानंतर आपल्याला आपल्या कर्तृत्ववान समाज बांधवांचा सत्कार करण्याची संधी मिळतेय ही मार्कंडेय महामुनींची कृपा आणि आपल्या बांधवांच्या मेहनतीचे फळ आहे...!!" असे प्रस्ताविकात श्रीनिवास एल्लाराम म्हणाले.
श्रीनिवास बोज्जा सत्काराला उत्तर देतांना म्हणाले, "मला आजपर्यंत एकही पुरस्कार मिळाला नव्हता, जो मिळाला तो थेट देशाच्या राजधानीच्या शहरातला मिळाला याचा आनंद आहे. त्यापेक्षा जास्त आनंद आज आपल्या समाजाचे शक्तीस्थान असणाऱ्या श्री मार्कंडेय महामुनींच्या साक्षीने आपल्या समाज बांधवांनी केलेल्या या कौतुकाचा आहे.
सूत्रसंचालन श्रीनिवास एल्लाराम यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमार आडेप यांनी केले. यावेळी लक्ष्मण इगे, रघुनाथ गजेंगी, गणेश विद्ये, शिवाजी संदूपटला, शेखर दिकोंडा, विनायक बत्तीन, कृष्णा संभार, श्रीनिवास वंगारी, सागर सबबन, व्यंकटेश नक्का, श्रीनिवास एल्लाराम, भीमराज कोडम, सुरेखा कोडम, दत्तात्रय अडगटला, रमेश बोगा ,आदींसह मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
0 टिप्पण्या