Ticker

6/Breaking/ticker-posts

खेड्यापाड्यात घुमतोय ॲड. प्रतापराव ढाकणेंचा 'गाव चलो घर चलो' अभियानाचा आवाज..!

 ॲड.  ढाकणेंची कष्ट कर्यांप्रती कृतिशील संवेदनशीलता 

घरोघरी जाऊन करतात युवक, महिला, वृद्धांसह  सर्व सामन्यांच्या समस्यांचे निराकरण



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)  

टाकळीमानुर : गेल्या काही वर्षांपासून आस्मानी तसेच सुलतानी संकटाने सर्वसामान्य गोरगरीब जनता, शेतकरी, शेतमजूर, कामगार, व्यावसायिक  अगदी भरडून निघाले आहेत. खेड्यापाड्यांतील लोकांना आजही विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांचे प्रश्न, अडीअडचणी जाणून घेत त्यांचे निराकरण करण्यासाठी ॲड. प्रतापराव ढाकणे यांनी 'गाव चलो घर चलो' अभियान सुरू केले आहे.


केदारेश्वर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस ॲड. ढाकणे यांनी सोमवारपासून (दि.७) 'गाव चलो घर चलो' अभियानाची सुरुवात पाथर्डी तालुक्यातील कारेगाव पासून केली. यावेळी त्यांनी कारेगावसह धायतडकवाडी, मोहटा, करोडी, चिंचपूर इजदे, कुत्तरवाडी, पिंपळगाव टप्पा आदी गावांतील ग्रामस्थ, शेतकरी, लहान-मोठे व्यावसायिक, ऊसतोड मजूर आदींची घरोघरी जाऊन भेट घेतली. 


यावेळी नागरिकांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेतल्या. तसेच त्याचे निराकरण करण्यासाठी संबधिंताकडे पाठपुरावा सुरू केला. चिंचपूर इजदे गावांतील एका बैलगाडीच्या चाकांना लोखंडी धाव बसविण्याचे पारंपरिक काम करणाऱ्या जुन्या कारागीराची भेट घेऊन त्यांचे कौतुक करत त्या कामाची माहिती जाणून घेतली. ॲड. प्रतापराव ढाकणे यांनी या अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन एकप्रकारे माणुसकीची कृतीतून संवेदनशीलता जपली आहे. 


याप्रसंगी गावागावांतील अनेक जुन्या बुजूर्ग लोकांनी प्रताप ढाकणेंच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवत आशीर्वादही दिले. या अभियाना अंतर्गत प्रताप ढाकणे यांनी मंगळवारी मानेवाडी, चिंचपूर पांगुळ, जोगेवाडी, ढाकणवाडी, वडगाव, आदी गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जोगेवाडी येथे जामखेड तालुक्यातील वैदू व्यवसायिकांची भेट झाली असता विविध झाडपाल्याच्या औषधाविषयीची माहिती घेऊन त्यांना आपल्या मुलांना शिक्षण देण्याचा सल्ला ढाकणे यांनी दिला. ॲड. ढाकणे यांचे हे अभियान असेच काही दिवस सुरू राहणार आहे.




यावेळी दौऱ्यात माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट, डॉ. राजेंद्र खेडकर, आजिनाथ बडे, दादासाहेब बारगजे आदी सहभागी झाले  होते. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या