Ticker

6/Breaking/ticker-posts

शासनमान्य ग्रंथालयात लवकरच ई प्रणाली ; जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर

 

कर्मचारी, पदाधिकाऱ्यांनी  सतर्क राहण्याचे आवाहन











लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)  

शेवगाव :  राज्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालयाचे नजीकच्या काळात संगणीकरण होणार असून हे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे भविष्यात प्रत्येक ग्रंथालयाची माहिती एका क्लिककर उपलब्ध  होईल. अचूक माहितीच्या दृष्टीने ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते तसेच कर्मचाऱ्यांनी संगणक व इंटरनेट साक्षर होऊन अधिक गतिमान होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी केले.


     जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने शेवगावच्या पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूलमध्ये तालुक्यातील ५४ शासनमान्य ग्रंथालयाचे पदाधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी आयोजित तालुकास्तरीय १३ व्या कार्यशाळेत श्री.गाडेकर बोलत होते. तांत्रिक सहाय्यक हनुमान ढाकणे, लिपिक संतोष कापसे, शेवगावच्या महात्मा सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल साजिद शेख ,पाथर्डीचे स्वस्तिक सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संदीप काटे यावेळी उपस्थित होते.




       ग्रंथालय व्यवस्थापन अनुदान प्रणाली संदर्भात या कार्यशाळेत लिपिक श्री.कापसे व शेवगावचे ग्रंथपाल श्री.शेख यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले. तर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. गाडेकर यांनी ग्रंथालय चळवळीचे  शासन स्तरावर होणाऱ्या बदलाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर मार्गदर्शन करून ग्रंथालय कार्यकर्त्यांच्या शंकांचे निरसन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या