मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे व सरव्यवस्थापक (शेती कर्ज) जयंत देशमुख यांची माहिती
शेतकरी हितासाठी जिल्हा बँक नेहमीच तत्पर ; शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जिल्ह्यातील प्राथमिक वि.का.सेवा संस्थेच्या शेतकरी सभासदांचे हित जोपासणेसाठी शासन आदेशाचे नेहमीच पालन करून विविध योजनां प्रभावीपणे राबविण्यात येतात. अशी माहिती जिल्हा बँकेचे जनरल मॅनेजर, शेतीकर्ज जयंत देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली.
त्यांनी पुढे विस्ताराने माहिती देताना म्हटले आहे , यामध्ये सवलतीच्या दरातील कर्जवाटप, प्रधानमंत्री फसल विमा योजना, डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना व एकरकमी कर्ज परतफेड योजना अशा अनेक शासन निर्णयाचा बाबीचा समावेश आहे.
१) पिककर्ज-
-पिक कर्जाच्या बाबतीत बँकेचे एकरी कर्जदर हे राज्यातील इतर बँकांच्या तुलनेत सर्वात जास्त असुन त्याचा फायदा जिल्हयातील प्राथमिक वि.का.सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांना होतो. दि. २१/७/२०२३ अखेर जिल्हा बँकेमार्फत २९९५८१ शेतकरी सभासदांना रू.२३३७.८२ कोटी कर्ज वाटप केलेले असुन शासनाने दिलेल्या उद्दिष्टाचे ८६% कर्ज वाटप झालेले आहे. अद्याप कर्ज वाटप चालु आहे. जिल्ह्यातील एकूण पिक कर्ज वाटपात जिल्हा बँकेचा ७५% पेक्षा जास्त वाटा आहे.
२) पशुपालन खेळते भांडवल कर्ज -
केंद्र शासनाच्या धोरणानुसार बँकेने सवलतीच्या व्याज दरात रू.२९६.८९ कोटी इतके पशुपालन खेळते. भांडवल कर्ज वितरण केले आहे. हे राज्यात सर्वाधिक आहे.
३) प्रधानमंत्री फसल पिक विमा योजना-
या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने सदर योजना सर्वसमावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतलेनुसार या योजनेत समावेश झालेल्या शेतकऱ्यांकडून प्रति पिक अर्ज फक्त रू. १/- भरून घेवुन विमा उतरविणे सुचित केले होते. त्यानुसार बँकेने कर्जदार शेतकरी सभासदांचा पिक विमा हप्ता रू.१/- बँक स्वनिधीतुन भरण्याचे ठरविले आहे. सदर विमा हप्ता रक्कम रू.१/- नाममात्र असला तरी जिल्हयातील कर्जदार शेतकरी पिक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहु नये यासाठी बँकेने सदर निर्णय घेण्यात आलेला आहे. खरीप व रब्बी हंगाम सन २०१५-१६ पासुन ते सन २०२०-२१ पर्यंत बँकेने कर्जदार शेतकऱ्यांचा एकुण विमा हप्त्यापैकी ५०% विमा हप्ता रकम रू.२३.४७ कोटी बँकेच्या स्वनिधीतुन भरलेली आहे. सद्यस्थितीत कर्जदार शेतकऱ्यांना विमा हप्ता रकम भरणे ऐच्छिक झाले आहे.
४) केंद्र शासन व्याज सवलत योजना :-
सदर योजनेअंतर्गत नाबार्डकडून सन २०२०-२१ सालाची ३ टक्के व्याज सवलत जिल्हयातील २२७९०२ रकम रू.३३.५६ कोटी दि. २२/७/२०२२ रोजी बँकेस प्राप्त झालेली असुन सदर रक्कम त्याच दिवशी तालुका शाखांना तालुक्यातील कर्जदार शेतकरी सभासदांचे बँक खाती जमा होण्यासाठी वर्ग केलेले आहेत. तसेच सन २०२१- २२ सालाचे ३ टक्के व्याज सवलत प्रस्ताव दि. २/११/२०२२ रोजी जिल्हयातील २७९१३० शेतकऱ्यांची रक्कम
रू. ३२.८१ कोटी नाबार्डकडे प्रस्ताव सादर केलेला असुन अद्याप रक्कम प्राप्त झालेली नाही.
५) डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना (राज्य शासन) :-
याबाबत अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दरवर्षी जिल्हयातील प्राथमिक वि.का. सेवा संस्थेच्या शेतकरी सभासदांना मोठ्या प्रमाणात अल्पमुदत पिक कर्ज पुरवठा व पशुपालन खेळते भांडवल कर्ज पुरवठा करत आहे. यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. तसेच सदर शेतकरी सभासदांनी कर्ज रक्कम रू.३.०० लाख पर्यंत अल्पमुदत कर्जाची नियमीत परतफेड केल्यास केंद्र शासन ३% व राज्य शासनाचे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत ३% याप्रमाणे ६% व्याज सवलत मिळत आहे. शेतकऱ्याची व्याजाची रक्कम पूर्णपणे त्याचे बँक खात्यात जमा होवून त्याला शुन्य टक्के व्याजदर पडत आहे.
सदर योजनेअंतर्गत सन २०१९-२० व सन २०२०-२१ पर्यंतचे व्याज सवलत योजनेअंतर्गत सर्व प्रस्ताव मंजुर असुन व्याज सवलतीची रकम शासनाकडून कर्जदार शेतकरी सभासदांचे बँक खाती जमा केलेली आहे. तसेच सन २०२१-२२ सालातील जिल्ह्यातील २५३७८२ कर्जदार शेतकरी सभासदांचे व्याज सवलत रक्कम रू.५६.०९ कोटी शासन स्तरावर हेही प्रलंबित आहेत.
सदर योजनेअंतर्गत शासनस्तरावर पाठपुरावा करून व्याज सवलत रक्कम प्राप्त करून घेवुन शासनाकडून प्राप्त झालेनंतर शेतकऱ्यांचे खाती जमा वर्ग केले जातात. तसेच सदर रक्कमाचे त्वरीत जमाखर्च करणेबाबत सुचना दिल्या जावून जमाखर्च केले जातात.या रकमेचा गैरवापर झालेला नाही.
एकरकमी कर्ज परतफेड योजना
सदर योजनेअंतर्गत जिल्ह्यातील थकीत शेतकरी सभासदांना शासनाचे विविध योजनेचा लाभ होणेकामी राज्यातील एकमेव अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविण्याचा निर्णय बँकेचे चेअरमन व संचालक मंडळाव्दारे घेण्यात आलेला असुन सदर प्रस्तावास शासन स्तरावर मंजुरी मिळणेबाबत सादर केलेला आहे. बँकेस मंजुरी प्राप्त होताच एकरकमी कर्ज परतफेड योजना कार्यान्वीत करण्यात येणार आहे. या योजनेचा ज्या शेतकऱ्यांना खुप जुन्या थकबाकीला शासनाच्या कोणत्याही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही अशा शेतकर्याना होणार आहे.
याशिवाय कोराना काळात पिक कर्ज व पशुपालन व खेळते भांडवल कर्ज मागणी येईल त्यास सरसकट कर्ज वितरण करून शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मोठा दिलासा दिला अशीही माहीती जिल्हा बँकेचे जनरल मॅनेजर, शेतीकर्ज व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.
0 टिप्पण्या