जास्तीत जास्त थकीत शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर : प्राथमिक वि .का. सेवा संस्थेमार्फत थकबाकीदार शेतकरी सभासदांना एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविन्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले व व्हाईस चेअरमन ॲड.माधवराव कानवडे यांनी दिली.
बँकेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळ सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाकडून सन २०१६ सालापासून विविध कर्जमाफी योजना जाहिर करून राबवण्यात आलेल्या आहेत. तथापी या कर्जमाफी योजनेत काही कर्ज प्रकारांचा समावेश नव्हता. यामध्ये जुन्या पाईपलाईन कर्ज, व्हेंचर कॅपिटल फंड कर्ज, मध्यम मुदत ट्रॅक्टर कर्जाचा समावेश नव्हता. सदरचे कर्जदार शेतकरी थकबाकीमध्ये राहिल्यामुळे हे शेतकरी सभासद शासनाचे इतर सवलतीच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत.
असे शेतकरी, सभासद बँकेकडे सदरची थकबाकी भरून नियमित कर्जदार होण्यास तयार आहेत, तसेच हे शेतकरी सभासद थकबाकीच्या व्याजात सवलतीची मागणी करीत आहेत. या मागणीबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात सविस्तर चर्चा होऊन जिल्हातील प्राथमिक वि का सेवा संस्थेच्या थकबाकीदार शेतकरी सभासदांना दिलासा देण्यासाठी व्याजात सवलत देउन एकरकमी परतफेड योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
अशी आहे योजना
जे शेतकरी सभासद दिनांक १.७.२०१६ पुर्वीचे थकबाकीदार आहेत, अशा सभासदांना साधरणतः व्याजदरामध्ये जवळपास दरसाल दरशेकडा ४% पर्यंत सवलत देण्यात येणार आहे. यानुसार साधारण मागील ७ ते १० वर्षापर्यंत थकबाकीदार सभासदांना व्याज रकमेत २४ % ते ३०% पर्यंत सवलत मिळु शकते. तसेच १० वर्षापेक्षा जास्त थकवकीदार शेतकऱ्यांना एकुण व्याज रकमेत साधारण ५० % ते ७५ % सवलत मिळु शकते. सदर योजना राबवणे संबंधीचा कालावधी योजनेस सहकार खाते व नाबार्डची मंजुरी मिळालेनंतर १ वर्षांचारा हणार असुन सदर एकरकमी परतफेड योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी सभासदांनी लाभ करून घ्यावा असे आवाहन शिवाजीराव कर्डीले व ॲड. माधवराव कानवडे यांनी केले
0 टिप्पण्या