चेअरमन, व्हा. चेअरमन पदाच्या निवडीसाठी कारखाना कार्यस्थळावर नमनिर्वाचित संचालक मंडळाची निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.प्रवीण लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रतापराव ढाकणे यांची कारखान्यात एकहाती सत्ता आहे. चेअरमन पदासाठी ऋषिकेश ढाकणे व व्हा.चेअरमन पदासाठी माधव काटे या नवनिर्वाचित संचालकांनी अर्ज दाखल केले. दोन्ही अर्ज छाननीत वैध ठरले.
चेअरमन पदासाठी श्री.ढाकणे यांच्या नावाची सूचना संचालक पांडूरंग काकडे यांनी मांडली.सूचनेला शिवाजी जाधव यांनी अनुमोदन दिले तसेच व्हा. चेअरमन पदासाठी श्री.काटे यांच्या नावाची सूचना सदाशिव दराडे यांनी मांडली.सुचनेस श्रीमंत गव्हाणे यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदाच्या निवडी बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले. नूतन पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
नूतन चेअरमन श्री.ऋषीकेश ढाकणे, म्हणाले, अत्यंत कष्टातून व प्रतिकूल परिस्थितीत श्री.बबनराव ढाकणे यांनी केदारेश्वर कारखाना उभा केला. प्रतापराव ढाकणे यांनी अडचणीत कारखान्याला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. ऊस उत्पादक सभासद शेतकरी, कष्टकरी कामगारांच्या हितासाठी रक्ताचे पाणी केले.मात्र,कारखाना विकू दिला नाही. मी केदारेश्वर कारखान्याच्या संघर्षाचा इतिहास जवळून पहिला आहे. त्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत कारखान्याच्या हितासाठी काम करत राहील.अतिशय कमी वयात मला ही जबाबदारी दिली, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. भविष्यात इथेनॉल प्रकल्प त्यासोबतच उपपदार्थ निर्मिती संदर्भातही आपण पावले टाकणार आहोत.लोकनेते बबनराव ढाकणे,अँड.प्रतापराव ढाकणे यांचे आपल्यावर संस्कार आहेत.
यावेळी अँड.प्रतापराव ढाकणे,मुख्यकार्यकारी अधिकारी अश्विनीकुमार घोळवे, व्हा. चेअरमन माधव काटे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी प्रमोद विखे,बोधेगावचे माजी सरपंच राम अंधारे, कुंडलिक घोरतळे,भाऊराव भोंगळे, संचालक डॉ. प्रकाश घनवट,बाळू फुंदे,भाऊसाहेब मुंडे, सुरेशचंद्र होळकर,अशोक तानवडे, बापूराव घोडके,श्रीमंत गव्हाणे,रणजित घुगे,शिवाजी जाधव,पांडूरंग काकडे,सदाशिव दराडे,तुषार वैद्य,त्रिंबक चेमटे,सुभाष खंडागळे,
सौ.मिना बोडखे,सौ.सुमन दहिफळे,रमेश गर्जे (कार्यकारी संचालक)आदी उपस्थित होते. शरद सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.तुषार वैद्य यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या