Ticker

6/Breaking/ticker-posts

३ लाखाहुन अधिक भाविकांचे शनिदर्शन



शनिशिंगणापूर :- येथे शानिआ मवस्या निमीत्त सुमारे  तीन लखाहुन अधिक भाविकानी शनिदर्शन घेतले. यावेळी पंढरपुर यात्रा, उन्हाची तीव्रता, व शाळेची संपलेली सुट्टी या कारनामुळे भाविकांची संख्या नेहमीपेक्षा कमी होती.

      देशविदेशतील भाविकानी शनिदर्शनसाठी रांगा लावल्या होत्या. राहुरी --शनिशिंगनापुर रस्ता दुतर्फा चालू होता. दिवसभर शनीभक्त शनी देवाच्या चरणी लीन झाले. या वेळी देवस्थान समितीच्या वतीने येणाऱ्या भक्तांची गैर सोय होऊ नये यासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते.

      शनिदेवसह   शनिचौथारा विविध  फुलांनी सजवले होते. याप्रसंगी शनिभकत्तासह विविध मान्यवर शनिदर्शन घेण्यासाठी दाखल होत होते .  तेथील पुरोहित अभिषेक वेदमंत्र देऊन शनिदर्शन देत होते . दर्शन रांगेत शनिदेवाचा जय जय कार केला जात होता. प्रवेश द्वारासह आकर्षक  मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

       

   विशेष अतिथिंचे स्वागत अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, सरचीटणीस आप्पासाहेब शेटे, सरपंच बाळासाहेब बानकर, पोलिस पाटील  सयाराम बानकर, यांच्यासह देवस्थाचे विश्वस्त हे करत होते.

      *शनिभक्ताना मनस्ताप*

,मुळा कारखाना, कांगोणी, संभाजीनगर, हनुमानवाड़ी, घोड़ेगाव रोड, पानसणाला, अदी मार्गवर भाविकाच्या वाहनाची पार्किंग व्यवस्था केली होती. देवस्थानकड़े येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाचे पार्किंग नियोजन 2/3 किलोमीटरवर केल्याने येणाऱ्या जाणाऱ्या भाविकाना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

पहाटेची आरती शनिभक्त माजी खा. चंद्रकांत खैरे व दुपारची आरती ज़िम्बोब्येचे उद्योगपति शनिभक्त जयेश शहा व मुख्यआयकर विभागाचे आयुक्त कर्नासाहेब, सायकालीची आरती पुणे येथील डेंटल विद्यालयाचे सदस्य हेडगेवार यांच्या हस्ते झाली.

     जिल्हा सहकारी बैंकचे अध्यक्ष शिवाजी कार्डिंले यांनी राज्यातील शेतकऱ्या साठी  धो धो पाऊस पडून पेरनी व्हावी, अशी प्रार्थना करुन शनिचरणी साकडे घातले*

         दिवसभरात महिपती देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे, पद्मश्री पोपट पवार, राज्याचे उद्योग सचिव प्राजक्ता लवांगरे , बालाजी देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा, रामभाऊ जगताप, दीपक पटारे, बाबासाहेब भोगे, भउराव कुरहे, मराठा महासघचे संभाजी दहातोंडे, आदींनी हजेरी लावली.

      *महसूल विभागाची पहिल्यांदा एंट्री*

        पहिल्यांदाच महसूल विभागाचे प्रांत अधिकारी सुधीर पाटील यांच्या  मार्गर्शनाखाली  तहसीलदार  बिराजदार यांनी दोन नायब तहसीलदार, चार तलाठी, व दोन सर्कल  मंडलाधिकारी  यांची यात्रेवर नियत्रण ठेवण्यासाठी नियुक्ति करण्यात आली होती. आरोग्य विभागाचे डॉ, राजेंद्र कसबे व डॉ. विधाटे यांनी भाविकाची आरोग्य तपासणी केली.

शेवगावचे अप्पर पोलिस अधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनख़ाली  स.पो.नी. रामचंद्र करपे  व स पो नी. माणिक चौधरी यांनी व चोख बंदोबस्त  ठेवला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या