Ticker

6/Breaking/ticker-posts

परीविक्षाधिन आयपीएस बी. चंद्रकांत रेड्डी शेवगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी

 

  


 





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 शेवगाव :  शेवगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून परिविक्षाधीन आयपीएस श्री.बी.चंद्रकांत रेड्डी यांनी सोमवारी (दि.19) रात्री उशिरा सूत्रे स्वीकारली.त्यामुळे हुजरेगिरी करणाऱ्या निवडक पोलिसांचे धाबे दणाणले.आंध्र प्रदेशातील श्री.रेड्डी 2021 चे युपीएससी  टॉपर आयपीएस असून त्यांचा शेवगाव पोलीस स्टेशनचा प्रशिक्षण कालावधी दि.19 जून ते 9 सप्टेंबर 2023 असा राहील.

       गेल्या महिन्यात शेवगावमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणूकीदरम्यान उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पीआय श्री.विलास पुजारी यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.मात्र,दिवसभर अनेक राजकीय नाट्यमय घटना घडल्या आणि त्यांची बदली अखेर रद्द झाली. बदली नाट्यामुळे शेवगाव ते मंत्रालय कनेक्शन अधोरेखित झाले.श्री. पुजारी यांची बदली रद्द झाल्याने शेवगामध्ये फटाके फुटले.

        अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे व शेवगाव उपविभागाचे डीवायएसपी श्री.सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.रेड्डी यांनी प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा,असे पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या