सोमराज बडे
श्री क्षेत्र गहिनीनाथ गड : ( चिंचपूर पांगुळ-)
बीड जिल्ह्या सह संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गहिनीनाथ गडावर आज वैराग्यमुर्ती संत वामनभाऊ महाराज यांचा ४७ वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात पार पडला . कार्यक्रमास रविवारी (ता.१५) रोजी गडाचे हभप.महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली . लाखो भाविक भक्ताच्या उपस्थीतीत सामाजिक कार्यकर्ते डॉ. नेहरकर यांनी पुण्याहून आणलेल्या हेलीकॉप्टर मधून समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करून उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परदेशी दौऱ्यावर जायचे असल्याने त्यांना येता आले नाही. तर पंकजाताई यांनी येणे टाळले . मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते . दरम्यान यावेळी मा.आ.भीमराव धोंडे, आ.बाळासाहेब आजबे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री सुरेश धस यांची भाषणे झाली.
सर्वानी आपल्या भाषणात बोलतांना गडासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी उपमुख्यमंत्र्यकडे केली.
दरम्यान पुढे बोलताना फडणवीस यांनी सांगितले की मी मुबंईला अरबी समुद्र पहिला आणि इथे आल्यावर हेलिकॉपटर मधून भक्तांचा महासागर पहिला आहे.
आदरणीय बाबांनी माझ्यावर वामनभाऊंचा फोटो असलेला भगवाध्वज देऊन जी जबाबदारी दिली आहे.
ती मी बाबांचा व गडाचा सेवेकरी म्हणून काम करेन.खरंतर मी आज परदेशी दौऱ्यावर जाणार होतो परंतु वामनभाऊंची इच्छा होती की मी आज यावे त्यामुळे मला आज दर्शन घेण्याचा योग जुळून आला.
या आधी मला गोपीनाथाचा आशीर्वाद मिळालेला होता.,आणि आज गहिनींनाथाचा आशीर्वाद मिळाला आहे.मी मुख्यमंत्री असताना व पंकजाताई पालकमंत्री होत्या त्यावेळी आम्ही पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता., त्यातील दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता.
नाथांचा संकेत असेल त्यामुळे राहिलेला निधी सुद्धा माझ्या हातून मिळावा यासाठी मला याठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून येता आले आहे.
यावेळी महंत विठ्ठल महाराज यांनी धर्मांतर या ज्वलंत प्रश्नांकडे उपमुख्यमंत्र्याचे लक्ष वेधले."आपली आई हि माझी आई आहे.,हे सांगणे गुन्हा नाही."
आपण धर्म कार्य करत राहावे ,हा समाज आपल्याला आशीर्वाद देईल.
देवेंद्र यांना आपण खरेतर लोकेंद्र म्हणायला हवे असेही विठ्ठल महाराज यांनी बोलतांना म्हटले.
दरम्यान दरवर्षी न चुकता या कार्यक्रमास उपस्तीत असनाऱ्या माजी मंत्री पंकजा मुंडे, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे,यांनी मात्र या कार्यक्रमाकडे आज पाठ फिरवल्याने पुन्हा एकदा देवेन्द्र फडणवीस व पंकजा मुंडे यांच्यातील दुरावा उघड झाला आहे.
यावेळी आरएसएस चे प्रांत कार्यवाह दादाजी इधाते,समरसता मंचचे निलेश गद्रे,आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे,माजी मंत्री आ.सुरेश धस,मा.आ.भीमराव धोंडे,आ.लक्ष्मण पवार,मा.आ.दरेकर,पत्रकार विलास बडे,राजेंद्र म्हस्के,डॉ तुकाराम नेहरकर आदीची व्यास पिठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी लाखोंचा भक्त परिवार राज्यभरातून
सोहळ्यास उपस्तीत होता. महाप्रसादाचे वाटप होऊन सोहोळ्याचि सांगता झाली . यावेळी गहिनीनाथ गडावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पार्किंग गडावरून चारही रस्त्यांवर 4 कि.मी केली तरीही प्रचंड गर्दीमुळे चौफेर रस्त्यांवर काही काळ वहातूक कोंडी झाली होती.
0 टिप्पण्या