लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर : दि ३ ऑक्टोबर २२
विजयादशमी निमित्त राज्यभर प्रसिद्ध असलेल्या सुपे सावरगाव येथील संत भगवान बाबांच्या जन्म गावी सुरू झालेल्या लोकनेते पंकजाताई मुंडे व खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या मेळाव्यास जिल्हाभरातून लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठान व मेळावा कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर येथील शासकीय विश्रामगृहावर शनिवार व रविवार असे सलग दोन दिवस प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका पार पडल्या. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत या मेळावयाच्या तयारीची माहिती देण्यात आली. यावेळी नगरसेवक रामदास आंधळे, अशोक दहिफळे, आनंद लहामागे, ॲड. युवराज पोटे, नितीन शेलार, कैलास गर्जे ,बंटी डापसे शिवाजी गरजे , रोहित सानप ,सतीश ढाकणे ,प्रदीप बोडके ,राहुल आंधळे, सोमनाथ चौधरी, प्रकाश पालवे ,आकाश ढाकणे, रोहन कुटे, कुमार बांगर ,विनायक चौधरी, राजू गीते, अशोक प्रशांत जगधने, आजिनाथ लटपटे ,विनायक सानप, शिवप्रसाद पालवे ,सौरभ कैदके, प्रताप बटूळे ,राहुल गीते ,सतीश कीर्तने ,शिवाजी पालवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून सावरगाव येथे होणारा दसरा मेळावा पंकजाताईंनी रद्द केला होता तसेच आरोग्याच्या दृष्टीने कोणालाही त्रास होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली होती .परंतु आता कोरोनाची परिस्थिती जवळपास आटोक्यात आल्याने दोन वर्षानंतर होणारा हा दसरा मेळावा ऐतिहासिक होणार आहे. त्यामुळे समाज बांधवांनी सुपे सावरगाव येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे ,असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या