लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांचे विशेष प्रयत्नातून २५१५ हेड (ग्रामविकास निधी) अंतर्गत वरूर - अमरापूर रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे शेवगाव उपविभागाचे उप अभियंता प्रल्हाद पाठक यांनी दिली.
वरूर - अमरापूर रस्ता शेतकऱ्यांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्याचे काम हाती घ्यावे,अशी ग्रामस्थांची अनेक वर्षापासून मागणी होती. स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी आ.मोनिका राजळे यांच्याकडे या रस्त्याच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने हा निधी मंजूर झाला. याआधी आ.राजळे यांनी वरुरच्या चांदणी नदीवरील बंधाऱ्यासाठी ४५ लाख रुपये, वरूर -भगूर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी ६० लाख रुपये तसेच दलित वस्तीतील लक्ष्मी मंदिर सभा मंडप कामासाठी ७ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.आता नव्याने वरूर - अमरापुर रस्त्यासाठी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांनी आ.राजळे यांचे आभार व्यक्त केले.
विकास कामात राजकारण नको
' धाकटी पंढरी ' असा लौकिक असलेले श्रीक्षेत्र वरुर विकासापासून कोसो मैल दूर आहे. माजी आ.नरेंद्र घुले पाटील व चंद्रशेखर घुले पाटील तसेच जि.प.च्या माध्यमातून माजी अध्यक्ष राजश्री घुले पाटील यांचे वरुरच्या विकासात मोठे योगदान राहिले,हे नाकारून चालणार नाही. तथापि, आ.मोनिका राजळे यांचा निधी वरुरला येतात काही जणांच्या पोटात गोळा उठतो, हे बरोबर नाही. निधी कोणी आणला हे महत्त्वाचे नसून गावाचा विकास होतो, हे महत्त्वाचे आहे.विकास कामात राजकारण नको.
- ज्ञानेश्वर भानुदास खांबट (भाजपा कार्यकर्ता)
0 टिप्पण्या