Ticker

6/Breaking/ticker-posts

अनेकांनी देव पाण्यात घातले पण,जीवनात "झुकेगा नही" : अॕड. प्रतापराव ढाकणे




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

बोधेगाव-कारखान्याची भरभराट न होवो यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले होते. परंतु मोठ्या संघर्षातून अनेक अडचणीवर मात करत या भागातील एका पिढीने त्याग करून उजाड माळराणावर मोठ्या संघर्षाने हा कारखाना उभा केला आहे. संघर्ष हा प्रत्येकाच्या वाटेला असतो. परंतु त्या संघर्षाचे चीज होणे हे देखील महत्त्वाचे आहे. आणि जो संघर्ष करून अडचणीतुन व आलेल्या संकटावर मात करून करून उभा राहतो त्यालाच खरे पुरुषार्थ म्हणतात. काहीही झाले तरी हा प्रताप ढाकणे कुणासमोरही "कुणा समोरही झुकेगा नही".असे प्रतिपादन संघर्षयोध्दा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अॕड.प्रतापराव ढाकणे यांनी केले. 



 पुढे बोलताना ढाकणे म्हणाले, जीवनामध्ये माणसाने प्रयत्नवादी राहायला पाहिजे आणि त्यामुळेच आज आम्ही कारखान्याची वाटचाल ही यशस्वीरित्या करत आहोत. मागच्या वर्षी आम्ही संस्थेच्या इतिहासात प्रथमच पावणे सहा लाख ऊसाचे गाळप चांगल्या प्रकारे केले असून यावर्षी देखील यापेक्षाही जास्त ऊसाचे गळीत यंदाच्या हंगामात करून केदारेश्वर विक्रमी उसाचे गाळप करणार आहे. यावर्षीचे उसाचे गाळप हे रेकॉर्डब्रेक असणार आहे. तसेच साखर उत्पादनही चांगल्या प्रकारचे होईल हा विश्वास आमच्या सगळ्यांच्या मनात आहे.


 येणाऱ्या वर्षाचे गळीत हंगाचे प्रत्यक्ष प्रारंभ दि. १७ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे व अहमदनगचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याचे प्रतिपादन संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अॕड. प्रतापराव ढाकणे यांनी केले. तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२२/२३ चा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ सोहळा शुक्रवार दि. ७ रोजी कारखाना स्थळावर ह.भ.प. महंत रामगिरी महाराज येळेश्वर संस्थान येळी यांच्या शुभहस्ते व कारखान्याचे अध्यक्ष अँड. प्रतापराव ढाकणे यांचे अध्यक्षतेखाली संचालक विठ्ठलराव भाऊराव अभंग व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मंदाकिनी विठ्ठलराव अभंग यांच्या शुभहस्ते सपत्निक बॉयलरची विधिवत पुजा करण्यात आली. 


यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थावरून संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अॕड.प्रतापराव ढाकणे हे बोलत होते. यंदाचा गळीत हंगाम कशाप्रकारे यशस्वीरित्या पार पाडण्यासंदर्भात पुढील नियोजनाबद्दल योग्य ते मार्गदर्शन तसेच वेगवेगळ्या उपाययोजना करण्यासंदर्भात आणि कारखाना कार्यस्थळावर इथेनॉलचा प्रोजेक्ट लवकरच चालू करणार असून कारखान्याची गाळप क्षमता देखील वाढवणार असल्याचे कारखान्याचे मुख कार्यकरी अधिकारी आश्विनकुमार घोळवे यांनी उपस्थितांना माहिती देताना सांगितले आहे.


 या कार्यक्रमात संचालक बापूराव घोडके, बोधेगावचे माजी सरपंच रामजी अंधारे, राजेंद्र गर्जे, सभासद प्रतिनिधी उध्दव दुसंगे, टाकळीमानूरचे माजी सरपंच राजेंद्र नागरे, बोधेगाव सेवा संस्थेचे जेष्ठ संचालक भाऊराव भोंगळे, सर्जेराव दहिफळे यांच्यासह आदींनी यावेळी बोलताना आपआपले मनोगत व्यक्त केले. 


यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ प्रकाश घनवट, मुख्य कार्यकारी अधिकारी आश्विनकुमार घोळवे, प्र.कार्यकारी संचालक रमेश गर्जे, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार, जेष्ठ संचालक सुरेशचंद्र होळकर, त्रिंम्बकराव चेमटे, भाऊसाहेब मुंढे, रणजित घुगे, सुभाष खंडागळे, बापूराव घोडके, चीफ इंजिनिअर प्रवीण काळूसे, मुख्य शेतकी अधिकारी अभिमन्यू विखे, सुरक्षा अधिकारी राजाराम केसभट, मोहनराव दहीफळे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. योगेश खेडकर, शेषराव बटुळे, भागीनाथ सीरसाठ, लीगल ऑफिसर शरद सोनवणे, बॉयलर सुपरवायझर विष्णुंपत खेडकर, केनियार्ड सुपरवायझर किसनराव पोपळे, पर्चेस अधिकारी तुकाराम वारे, चीफ केमिस्ट कुंडलिक सांगळे, बोधेगावचे माजी सरपंच रामजी आंधरे, जेष्ठ नेते कुंडलिकराव घोरतळे, भाऊराव भोंगळे, अरुण बडे, सेवानिवृत्त तहसीलदार राजेंद्र दराडे, वैभाव दहिफळे,महारूद्र कितॕने,स्टोअर अकाऊंटट विक्रम केदार, सामाजिक कार्यकर्ते शहाजी जाधव, आंबदास दहिफळे, सुधाकर खोले, भाऊराव निर्मळ,चंद्रकांत भापकर यांच्यासह संचालक मंडळ, सभासद, मान्यवर, परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, कार्यकर्ते, हितचिंतक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीगल ऑफिसर शरद सोनवणे यांनी केले तर प्रास्तविक मुख्य कार्यकारी अधिकारी आश्विनकुमार घोळवे यांनी तर आभार कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ प्रकाश घनवट यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या