Ticker

6/Breaking/ticker-posts

चलो, सावरगाव घाट...चलो भगवान भक्तिगड...! ; पंकजाताई मुंडेंच्या उपस्थित सावरगाव घातला होणार विराट दसरा मेळावा..!

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर : दि ३ ऑक्टोबर २२

 नगर शहर व जिल्ह्यातून उद्या ५ ऑक्टोबरला बीड जिल्ह्यातील (सुपे) सावरगाव येथे भगवान बाबांचे जन्मस्थान असलेल्या भगवान भक्तीगडावर पंकजाताई मुंडे यांचा दसरा मेळावा होणार असून, या मेळाव्यासाठी शहर व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सर्व समाजबांधव व बहुजन समाज सहभागी होणार असून मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.  सावरगाव येथे लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचाच एकमेव मेळावा होणार असून दुसऱ्या मेळाव्याच्या अफवा पसरविण्यात येत आहेत, या भूलथापांना बहुजन समाज व समाजबांधव यांनी बळी पडू नये, तर बाबांच्या दर्शनानंतर थेट सावरगावला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



 या मेळाव्याला जाण्याच्या नियोजनासाठी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे मुंडे समर्थक, स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे पदाधिकारी व वंजारी समाजातील ज्येष्ठ पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. बैठकीची सुरुवात स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली . या बैठकित दसरा मेळावा हा एकच होणार असून, भगवान गडावर भाविक दर्शन घेऊन (सुपे) सावरगाव येथील भक्ती गडावर मेळाव्यासाठी हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर दोन मेळाव्यांच्या अफवांना बळी न पडता स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या दसरा मेळाव्याच्या परंपरेनंतर पंकजाताई मुंडे यांना बळ देण्यासाठी हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे.  


यावेळी रामदास आंधळे यांनी दसरा मेळाव्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने वंजारी समाजासह इतर बहुजन समाज बांधव सहभागी होणार आहे. हा मेळावा वंजारी ओबीसी समाजापुरता मर्यादित नसून, भगवान बाबांचे सर्व अनुयायी सहभागी होणार आहे. समाजबांधवांनी अफवांवर विश्‍वास न ठेवता सावरगावला उपस्थित राहण्याचे स्पष्ट केले.

दसरा मेळाव्याला सावरगाव येथे लाखोंच्या संख्येने समाजबांधव पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी शहर व ग्रामीण भागात बैठका घेऊन नियोजन करण्यात आले आहे. 5 ऑक्टोंबरला सकाळी पाईपलाइन रोड, श्रीराम चौकातून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व समाजबांधव या रॅलीत सहभागी होऊन डीएसपी चौक, चांदणी चौक व धामणगाव मार्गे सावरगाव येथे मेळाव्यास जाणार असल्याची माहिती या बैठकित देण्यात आली.

 विशेष म्हणजे शिर्डी येथून ७० फूट लांब व ५०० किलो वजनाचा हार भक्ती गडावर संत भगवान बाबांच्या भव्य मूर्तीस अर्पण करण्यासाठी नेला जाणार आहे. मेळाव्याला जाण्यासाठी सर्व बहुजन समाजबांधवांकरिता वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून, सावरगावला वंजारी समाजासह संपूर्ण बहुजन समाज एकवटणार आहे.

    प्रास्ताविकात कैलास गर्जे यांनी मागील पाच वर्षापासून पंकजाताई मुंडे सावरगाव येथे दसरा मेळावा घेत आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे हा मेळावा झाला नाही. काही दोन मेळाव्यांचा संभ्रम निर्माण करत असून, हा एकच मेळावा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


आनंद लहामगे म्हणाले की, हा मेळावा भव्य दिव्य करण्यासाठी शहर तालुक्यांसह संपूर्ण जिल्ह्यात नियोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातून विचारांची देवाण-घेवाण होऊन समाजाला एक स्फूर्ती मिळते. सध्या समाजात दुफळी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असून, सर्व समाज बांधवांनी एकजुटीने पंकजा मुंडे यांच्या पाठिशी उभे रहावे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांना आपली बहीण मानले आहे. त्यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वसामान्य जनता या मेळाव्यास हजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


शिवाजी पालवे म्हणाले की, या दसरा मेळाव्यातून समाज बांधवांना दिशा व प्रेरणा मिळत असते. संत भगवान बाबांचा आशीर्वाद घेऊन मेळाव्यातून समाज बांधव एकवटत असतो. मुंडे परिवाराला मानणारा मोठा जनसमुदाय असून, ते या मेळाव्यात सहभागी होणार आहे. समाज हितासाठी घराबाहेर पडून लढण्याची प्रेरणा स्व. गोपीनाथ मुंडे यांनी दिली. त्यांची शिकवण आज सत्यात उतरविण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. नितीन शेलार यांनी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची परंपरा पंकजाताई पुढे चालवत आहे. या मेळाव्यात धनगर समाजासह अठरापगड जातींचा समावेश असतो. भगवान गडाचे दर्शन घेऊन सावरगावला मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

यावेळी नगरसेवक रामदास आंधळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे, माजी नगरसेवक नितीन शेलार, प्रदीप घोडके, प्रकाश पालवे, कैलास गर्जे, माजी सैनिक संघटनेचे शिवाजी पालवे, आदिनाथ कंगळे, महादेव शिरसाठ, शिवाजी पठाडे, शिवप्रसाद पालवे, भगवान बाबाचे नातू विनायक सानप, आजिनाथ लटपटे, प्रताप बटुळे, राहुल गीते आदी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या