Ticker

6/Breaking/ticker-posts

शारदीय नवरात्रौत्सवाची वरुरला दिमाखदार सोहळ्याने सांगता.

 



      लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


 शेवगाव : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने वरुर,(ता.शेवगाव) येथील नारीशक्ती समूहाच्या माध्यमातून शंभरहून अधिक महिलांनी एकत्र येत ' जागर स्त्री शक्तीचा ' या कार्यक्रमांतर्गत विविध सामूहिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली तसेच श्री दुर्गा सप्तशती पारायण,होम मिनिस्टर स्पर्धेत महिलांनी लक्षणीय सहभाग नोंदवला. लक्ष्मण डाके यांच्या नेतृत्वाखाली माऊली गीतावर शंभरहून अधिक महिलांनी वेशभूषेसह सादर केलेल्या नृत्याविष्काराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.उत्सवाच्या सांगता समारंभात बक्षीसपात्र गृहिणींचा यथोचित सन्मान करण्यात आला. 

   


  

नारदीय कीर्तनकार तथा धर्म साहित्याच्या अभ्यासक रागिनी भारदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.महिला पोलीस नाईक संगीता पालवे -घुगे,आदर्श शिक्षिका श्रीमती श्रीकांता शिंदे,डॉ.प्रतीक्षा बेडके,डॉ.अर्चना पाचरणे,सरपंच सौ.दामिनी कर्डिले आदींची याप्रसंगी मार्गदर्शनपर भाषणे झाली.राज्यस्तरीय बीज प्रक्रिया स्पर्धेत जिल्हा पातळीवर द्वितीय क्रमांक मिळविलेल्या प्रगतशील महिला शेतकरी सौ.शोभा वावरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 

            

प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया हिमतीने आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे. प्रापंचिक जबाबदारीतून वेळ काढून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी तसेच गावाचे सांस्कृतिक वैभव टिकून ठेवण्यासाठी नारीशक्तीचे संघटन आवश्यक आहे.अनेक वर्षांची पौराणिक परंपरा असलेल्या हा सामाजिक,सांस्कृतिक उपक्रम स्तुत्य आहे,असे गौरवोद्गार रागिनी भारदे यांनी काढले. 

         

मीना खैरे ,अर्चना खडके, सुमय्या पठाण ,कालिंदी डांगरे ,सरला म्हस्के ,वैष्णवी येळीकर तसेच नारीशक्ती ग्रुपच्या महिलांनी कार्यक्रमांचे व्यवस्थित नियोजन केले तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री निलेश मोरे, गोरक्ष पठाडे, संतोष खडके, प्रसाद ओझा ,आत्माराम  म्हस्के, लखन म्हस्के आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या