वृद्ध दांपत्याला जबर मारहाण
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
टाकळीमानुर :- पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर शिवारातील शिरसाट वस्ती खंडोबाचा खेळा येथे शनिवारी रात्री चोरट्यांनी वस्तीवर दरवाजा तोडत सोसायटी माझी व्हाचेअरमन चेअरमन ग्रामपंचायत सदस्य आजिनाथ शिरसाठ यांच्या वस्तीवर हल्ला करत त्यांच्या वृद्ध माता-पित्याला मारहाण करत 55 हजार रुपये रोख बारा तोळे सोने चांदीच्या दागिनेसह घराला बाहेरून कडी घालत व बरा केला यामध्ये नारायण शिरसाट व कलावती शिरसाठ यांना मारहाण करत केल्याने ते जखमी झाले आहेत या घटनेने टाकळी मानूर परिसरात घबराट पसरली आहे
चोरट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे याबाबत शिरूर कासार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर वृत्त असे शिरूर कासार तालुक्यात टाकळीमानुरचा परिसरातील टाकळी मानूर ते मानूर या रस्त्यावर असणाऱ्या शिरसाट वस्ती येथे शनिवारी रात्री एक ते दीडच्या दरम्यान चोरट्यांनी सेवा संस्थेचे माझी चेअरमन तथा ग्रामपंचायत सदस्य अजिनाथ शिरसाठ यांचे आई-वडील राहतात त्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी हल्ला करत त्यांच्यामात्यापित्याला मारहाण करत त्यांच्या घरातील सामानाची उचकापाच करून घरातील रोख रक्कम सोन्या-चांदीचे दागिने घेऊन त्यांना घरात डांबून ठेवत पोबरा केला. घटनास्थळी श्वानपतकासह ठसे तज्ञ टीम दाखल झाली श्वानांनी टाकळीमानुर हत्तीच्या पर्यंत असणाऱ्या मंकरणा नदीपर्यंत मार्ग दाखवला वृद्ध नारायण शिरसाट यांच्या पाठीत जबर मार लागला असून फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे. दोघांना पाथर्डी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रात्री पाठवले होते घटनास्थळी फिंगरप्रिंट घेण्यात आले आहे.
घटनास्थळाचा पंचनामा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित बडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आष्टी अभिजीत धाराशिवकर यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.
एलसीबी गुन्हा अन्वेषण विभाग तपासात कार्यरत असल्याचे तपासी अधिकारी सुजित बडे यांनी बोलताना सांगितले यावेळी अजित शिरसाठ यांच्या वृद्ध आई-वडिलांची संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी विचारपूस केली. गहीनाथ शिरसाट धनंजय बडे दशरथ वनवे ॲड. गणेश शिरसाठ आप्पासाहेब शिरसाठ , जगदीश आदींनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपास कार्यात मदत केली.
0 टिप्पण्या