लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर – सर्वसामान्यांना अल्पदरात आयुर्वेद उपचार मिळावेत यासाठी गंगाधरशास्त्री गुणे यांनी सूर केलेल्या या हॉस्पिटलमध्ये त्यांची आरोग्यसेवेची परंपरा जपाली जात आहे. स्थापनेचे शतक पूर्ण केलेल्या या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना चांगल्या सोयी सुविधांयुक्त आयुर्वेदीक उपचार मिळावेत यासाठी काही विभागांचे नूतनीकरण केले आहे. गुणे आयुर्वेद हॉस्पिटल मधील तज्ञ व अनुभवी डॉक्टर रुग्णांवर चांगले उपचार करत आहेत. येथे मिळणाऱ्या सुविधांचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे अध्यक्ष आ.अरुणकाका जगताप यांनी केले.
कै.वै.पं.गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेद हॉस्पिटल व महाविद्यालया मधील बाह्यरुग्ण तपासणी, कायाचिकित्सा, शल्यतंत्र, स्वास्थ्यरक्षा व औषधी निर्माण आदी विभागांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या नुतानिकृत विभागांचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष आ.अरुणकाका जगताप, सचिव डॉ.विजय भंडारी, सहसचिव सचिन जगताप व उद्योजक जनक आहुजा यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालिका वैशाली ससे, यशवंत सुरकुटला, ज्ञानेश्वर रासकर, कुलकर्णी, प्राचार्या डॉ.प्रमिला नलगे-दिवटे, माजी प्राचार्या डॉ.अंजली देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.समीर होळकर, प्रतिभा भारदे आदींसह हॉस्पिटल मधील डॉक्टर व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. डॉ.किरण जावळे व सौ. शिल्पा जावळे यांच्या हस्ते नव्या विभागांची वास्तुशांती पूजा करण्यात आली.
डॉ.विजय भंडारी म्हणाले, मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या गुणे आयुर्वेद हॉस्पिटल मध्ये सामाजिक जाणीवेतून रुग्ण सेवा केली जात आहे. येथील जुन्या इमारतींचे टप्याटप्याने नूतनीकरण करण्यात येत आहे. हॉस्पिटल मधील नुतानिकृत विभागांमधून रुग्णांना चांगल्या सोई मिलांर आहेत.
सचिन जगताप म्हणाले, नागरिकांचा आयुर्वेद उपचारा कडे ओढा वाढला आहे. गुणे आयुर्वेद मध्ये पूर्वीपासूनच अत्यल्प दरात दर्जेदार आयुर्वेद उपचार केले जात आहेत. नगर शहरासह जिल्ह्यातील व बाहेरील जिल्ह्यातील नागरिक येथील उपचारांचा लाभ घेत आहेत.
प्रास्ताविक प्राचार्या डॉ.प्रमिला नलगे यांनी केले. यावेळी डॉ.ए,टी.देशमुख, डॉ.सुरज ठाकूर, डॉ.नितीन जाधव, डॉ.लोखंडे आदींसह प्राध्यापक डॉक्टर उपस्थित होते.
0 टिप्पण्या