Ticker

6/Breaking/ticker-posts

काँग्रेस छोडोचा कार्यक्रम संपूर्ण देशात जोरात सुरू- ना. विखे पाटील

विरोधकांना जनाधार नाही,  त्यामुळे अस्तित्वासाठी त्यांची पदयात्रा








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


नगर.दि.७ सप्टेंबर २०२२

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीवर विरोधकांना कुठेही बोट ठेवायला जागा नाही. त्यांची आंदोलन सुरू असली तरी, जनाधार कुठेही नाही. त्यामुळेच अस्तित्वासाठी व  प्रसिध्दी मिळविण्यासाठी सुरू केलेल्या पदयात्रेपेक्षा काॅग्रेस छोडोचा कार्यक्रम संपूर्ण देशात जोरात सुरू झाल्याची  घणाघाती टिका महसूल, दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.


राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून जेष्ठ नागरीकांना मंजूर झालेल्या साधन साहित्याचे वितरण आणि जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नगर तालुक्याच्या वतीने मंत्री विखे पाटील यांचा नागरी सत्कारही करण्यात आला. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आ.राम शिंदे, जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, प्रतिभाताई पाचपुते, खासदार. डॉ. सुजयदादा  विखे पाटील, तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे ,सरपंच विजय शीलमकर, अक्षय कर्डीले, संतोष म्हस्के, हरिभाऊ कर्डीले, अभिलाष घिगे व नगर तालुक्यातील लाभार्थी व ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


केंद्र सरकारच्या  वयोश्री योजनेच्या माध्यमातून  अहमदनगर जिल्हा भारतात प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगतानाच  देशाचे प्रंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या 'सबका साथ सबका विकास' हा एकच मंत्र देशाच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरला असून केंद्र सरकारचे निर्णय धनदांडग्या व्यक्तिसाठी नाहीत तर  समाजातील शेवटचा माणूस  कल्याणकारी योजनांचा लाभार्थी झाला असल्याचे विखे म्हणाले.


 कोरोनामध्ये आर्थिक महासत्ता असलेले अनेक  देश अर्थिक संकटात सापडले आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या निर्णयामुळे देशात विक्रमी मोफत  लसीकरण झाल्याने भारत देश पुन्हा उभारी घेवून वाटचाल करीत असल्याकडे लक्ष वेधून देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देवून प्रधानमंत्र्यांनी उपासमारी होवू दिली नाही.राज्यात सतेवर असलेल्या आघाडी सरकारने काय दिले असा प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्री फक्त फेसबुकवर दिसत होते.माझे कुटूंब तुमची जबाबदारी असा एकमेव कार्यक्रम सुरू होता.जिल्ह्यात तीन मंत्री होते परंतू अडीच वर्षात एकही विकास काम होवू शकले नसल्याची टिका मंत्री विखे पाटील यांनी केली.


आघाडी सरकारने पेट्रोल डिझेल वरील कर माफ केले नाहीत.पण दारू स्वस्त केली. मोदी सरकारकडे बोट दाखवायलाही जागा नाही.आपल्या आठ वर्षाच्या यशस्वी कार्यामुळेच मोदी विश्वनेता बनले असल्याचा अभिमान असल्याचे विखे म्हणाले. राज्यात नव्याने आलेल्या सरकारने सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय करण्यास प्रारंभ केला आहे.कोव्हीड काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी पर्यतचा संपूर्ण खर्च राज्य सरकारने करण्याचा निर्णय घेतला असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.


 जलजीवन मिशन अंतर्गत बुरानगर प्रशिक्षण आणि पुरवठा योजनेसाठी 195 कोटी रुपयांचा निधी हा  शिंदे व फडणवीस सरकारने मंजूर केला असल्याचे सांगतानाच   अहमदनगर जिल्हा पूर्णपणे दुष्काळमुक्त करण्याच उद्दिष्ट असून साकळाई  व कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्राला न्याय मिळवून देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.



खासदार डॉक्टर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 60 वायांवरील नागरिकांसाठी राष्ट्रीय वयसवीच्या माध्यमातून मोफत साहित्य वाटप होत आहे .यामध्ये कानाची मशीन चष्मा कमोड व्हीलचेअर इत्यादी साहित्याचा समावेश करण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेष्ठ नागरिकांची जबाबदारी स्वीकारून एक रुपया  न घेता घरी जाताना किमान दहा हजार रुपये आवश्यक साहित्य घेऊन जाणार आहे.  केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजना अहमदनगर मतदारसंघात राबवून गोरगरीब  जनतेपर्यंत पोहोचवण्याची  ग्वाही यावेळी डॉक्टर विखे यांनी दिली


माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र शासनाच्या वतीने  नागरिकांसाठी मोफत साहित्य वाटेल शिबिर खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून घेण्यात आली आज कालच्या धकाधकीच्या जीवनात वृद्धांकडे मुलांना द्यायला वेळ नाही अशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय वयोश्री योजनेतून  वृद्धांना साहित्य वाटप केले.


 आमदार राम शिंदे म्हणाले की 195 कोटीच्या जीवन मिशन पाणी योजनेचे भूमिपूजन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पना हर घर जल योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे  ही योजना केंद्र सरकारने सुरू केल्याचे आ.शिंदे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या