Ticker

6/Breaking/ticker-posts

सर्वसामान्य माणूस विकास प्रक्रीयेत सामाविष्ट झाल्याने जगात बलशाली भारताची वेगळी ओळख निर्माण झाली - महसूल मंत्री विखे पाटील

   




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)      

नगर दि.१७ सप्टेंबर २०२२

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनदांडग्यांसाठी नव्हे तर सामान्य माणसांठी देशात योजनांची अंमलबजावणी केली. देशातील प्रत्येक माणूस योजनेच्या रुपाने विकसाच्या  प्रक्रीयेत समाविष्ट  झाल्यामुळेच जगात बलशाली भारताची वेगळी ओळख निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सेवा पंधरवड्याचा शुभारंभ नगर येथे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जेष्ठ नागरीकांना  राष्ट्रीय वयोश्री योजनेतील  साधन साहीत्य वितरीत करून करण्यात आला. भाजपाचे जेष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले, प्रतिभाताई पाचपुते, जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, शहर जिल्हाध्यक्ष  महेंद्र भैय्या गंधे, माजी नगराध्यक्ष अभय आगारकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे , वसंत लोढा,  आंबादास पिसाळ, दिलीप भालसिंग, नरेंद्र कुलकर्णी, रवींद्र बारस्कार, तुषार पोटे, वसंत राठोड, धनंजय जाधव, निखिल वारे,  आदी  उपस्थित होते.


आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की,मोदीजीनी आपले संपूर्ण आयुष्य या देशासाठी आणि समाजासाठी समर्पित केले.सेवेचे व्रत अखंड अव्याहतपणे पुढे घेवून जाताना समाजील सर्व समान्य माणूस विकासाच्या प्रवाहात आणण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले.देशातील प्रत्येक सामान्य माणसाला मोदीजींच्या योजनेचे पाठबळ मिळाल्याचे विखे म्हणाले.



कोव्हीड सकंटात जगाच्या पाठीवर कोणाला जमले नाही ते मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताने करून दाखवले.देशात दोनशे कोटीहून अधिक नागरीकांचे मोफत लसीकरण आणि ८० कोटी नागरीकांना मोफत धान्य देवून आपले दायित्व मोदीनी निभावले सता हे सेवेचे साधन मानून त्यांनी सामान्य माणसाला उभारी दिल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.


मागील आठ वर्षातील कार्यकाळात या देशात केंद्र सरकारने धनदांडग्यासाठी नव्हे तर सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय केले.त्यामुळेच भाजपाचा जनाधार वाढला आहे.सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोदी सरकारच्या योजनांचा संदेश या सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने करण्यात येणार असून,राज्य सरकारच्या वतीने आजपासून राष्टनेता ते राष्ट्रपिता या  पंधरवड्यात शासनाच्या विविध विभागातील दाखल झालेले अर्ज निकाली काढण्यात येणार असल्याची माहीती विखे पाटील यांनी दिली.याप्रसंगी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले खा.डॉ सुजय विखे पाटील अरूण मुंढे भैय्या गंधे यांची भाषण झाली.



खासदार डॉ.विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजना लाभ मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही संकल्प करीत आहोत. जे जे स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब जनतेसाठी पाहिले होते ते आपल्याला पूर्ण करायचे आहे. महसूल विभागाचा वापर हा वाळू  तस्करांसाठी नाही, जे अधिकारी पैसे घेतात त्यांच्यासाठी नाही,  पुढच्या अडीच वर्षात महसूल विभागाचा वापर सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी केला जाईल. शासन आपल्या दारी अंतर्गत पुढील सहा महिन्यात नगरशहरातील प्रत्येक प्रभागात नगरसेवकांच्या माध्यमातून मोफत कुपन काढून दिले जाणार. ज्या करिता नागरिकांना बाहेर पैसे देवे लागत होते.  नागरिकांना एक रूपया खर्च न करता उपलब्ध करून दिले जाणार आहे. आज देखील स्वस्त धान्य दुकानांमधून खरे लाभार्थी वंचित राहातात. सर्व  गरीब जनतेला धान्य मिळून देण्यासाठी भाजप कार्यकर्ते प्रयत्न करतील.राज्यात सत्ता असो किंवा नसो आम्ही जनतेच्या हितासाठी काम करण्यासाठी  कटीबद्ध असल्याचे डॉ.विखे यांनी सांगितले.


मोदीच्या वाढदिवसा निमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांच्या राजकीय सामाजिक वाटचाली वरील तसेच धोरणात्मक निर्णयावरील प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले.  कार्यक्रमास नागरिकांसह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या