शेतकऱ्यानी केवायसी तत्काळ पुर्ण करावी -गटविकास अधीकारी पालवे यांचे आवाहन
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
खरवंडी कासार : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा निरंतर लाभ मिळण्यासाठी लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्याची बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे. त्याची मुदत आज ७ सप्टेंबरपर्यंतच आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्याची ई केवायसी करायचे बाकी आहेत त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात असणाऱ्या संगणक परिचालकाकडे जाऊन आपली ई केवायसी करून घ्यावी. असे आवाहन पाथर्डीचे गटविकास अधीकारी डॉ.जगदीश पालवे यांनी केले आहे .
ई -केवायसीसाठी शासणाने पुर्वी ३१ ऑगष्ट पर्यंत मुदत दिली होती. त्यात वाढ करत आता ७ सप्टेबर पर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे पाथर्डी तालुक्यातील शेतकरी या योजनेपासुन वंचीत राहु नये, म्हणुन गटविकास अधीकारी डॉ . पालवे यांनी पाथर्डी च्या पुर्व भागातील खरवंडी, मालेवाडी, मिडसांगवी, भालगाव आदी ग्रामपंचायतमध्ये भेटी देत सगंणक परिचालकाना सुचना केल्या. शेतकऱ्याची अडवणुक न करता सहकार्य करा व ई केवायसी न झालेल्या शेतकऱ्याची ई केवायसी करून घ्या अशा सुचना सगणंक परिचालकाना केल्या .
योजनेचा लाभ योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं ई-केवायसी करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे आपल्या आधार क्रमांकाशी संलग्न बँक खात्यामध्ये अनुदान वितरित होण्यासाठी लवकरच प्रारंभ होणार आहे. याशिवाय सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट २०२२ पासून योजनेच्या पुढील लाभाचे हप्ते निरंतर मिळवण्याकरिता केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे.
केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्रावर बायोमॅट्रिक पद्धतीने प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर १५ रुपये निश्चित केला आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांनी ७ सप्टेंबरपूर्वी केवायसी करणे बंधनकारक केले आहे.
0 टिप्पण्या