लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर – नगर अर्बन बँक आजही पूर्वी प्रमाणे भक्कम स्थितीत आहे. नगर अर्बन बँकेला पूर्वपदावर आणण्यासाठी सत्ताधारी संचालक मंडळ कटीबद्ध आहे. रिझर्व्ह बँक पूर्ण सहकार्य करीत आहे. श्रीगणेशाच्या कृपाशीर्वादाने बँक लवकरच पूर्णपणे निर्बंध मुक्त होईल, असे प्रतिपादन अगर अर्बन बँकेच्या प्रभारी चेअरमन दीप्ती गांधी यांनी केले.
नगर अर्बन बँकेत गणेशोत्सवा निमित्त श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आली. यावेळी चेअरमन दीप्ती गांधी यांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी बँकेचे प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी एम.पी. साळवे, प्रमुख व्यवस्थापक सतीश रोकडे, वरिष्ठ अधिकारी सुनील काळे, मारुती औटी आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
एम.पी. साळवे म्हणाले, नगर अर्बन बँकेने थकीत कर्ज वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरु केली आहे. यासाठी कठोर निर्णय घेत कारवाई किली जात आहे. त्यामुळे कर्ज वसुलीस वेग आला आहे. बँकेवरील निर्बंधास मंगळवारी रिझर्व्ह बँकेने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. या तीन महिन्यात सर्व कर्मचाऱ्यांना जास्तीतजास्त कर्ज वसुली करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
0 टिप्पण्या