लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
या
चर्चेमध्ये आपले गुरुजी उपक्रमांतर्गत वर्ग
खोल्यांमध्ये शिक्षकांचे Aफोर साईज फोटो वर्गात लावणे या
विषयाबाबत चर्चा केली असता दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी पुणे येथे होणाऱ्या बैठकीमध्ये तो निर्णय मागे घेतला जाईल, अशी ग्वाही शिक्षण मंत्री यांनी दिली.,
शालेय पोषण आहाराचे मागील पाच वर्षाचे ऑडिट शाळा स्तरावर न करता
तालुकास्तरावर करण्यात यावे, "आम्हाला शिकवू द्या"
यासाठी प्राथमिक शिक्षकांकडे असणारे बीएलओ व इतर अशैक्षणिक कामे आणि अनावश्यक
उपक्रम बंद करणे बाबतचे आदेश काढण्यात येतील असे सांगितले.,
प्राथमिक शिक्षकांमध्ये उच्चशिक्षित असणाऱ्या शिक्षकांना प्रमोशन
देण्याबाबत अर्थ विभाग व प्रशासन विभाग यांच्याशी चर्चा करण्यात आली असून लवकरच तो
निर्णय घेण्यात येईल., जुनी पेन्शन बाबत चर्चा केली असता तो
निर्णय फक्त प्राथमिक शिक्षकांसाठी लागू न करता सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू करावा
लागेल यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री
अर्थमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात
येणार आहे., शिक्षण सेवकांचे मानधन वाढविण्यात येणार आहे.
याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल असे मंत्री महोदयांनी सांगितले.
केंद्रप्रमुख
व इतर पदे भरण्याबाबत मुख्यमंत्री अनुकूल आहे., वस्तीशाळा
शिक्षकांच्या जुन्या सेवेबाबत मंत्री महोदय यांनी अनुकूल मत व्यक्त केले..,
विषय पदवीधर शिक्षकांना विषयनिहाय 30 टक्के
रद्द करून सर्वांना पदवीधर वेतनश्रेणी देण्याबाबत चर्चा करण्यात आली.,
सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याबाबत अर्थसंकल्पामध्ये तरतूद
करून पुढील वर्षापासून सुरू करण्यात येईल., येणाऱ्या
शैक्षणिक वर्षापासून बहुभाषिक पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहे., प्राथमिक शाळांना नवीन प्रकारच्या इमारती, शाळेची
विज बिल, ब्रॉड ब्रँड कनेक्शन, पाण्याची
सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी याबाबत चर्चा करण्यात आली., स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना १०/२०/३० ची
आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी., 1 जानेवारी 2004 नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीमध्ये होणार्या
वेतन त्रुटीचे निराकरण करून बक्षी समितीचा खंड दोन अहवाल प्रसारित करण्यात यावा.,
राज्य व जिल्हा पातळीवर पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पूर्वीप्रमाणे
एक जादा वेतन वाढ देण्यात यावी., वैद्यकीय उपचारासाठी
शिक्षकांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. शिक्षक
मतदार संघासाठी माध्यमिक शिक्षकांप्रमाणेच प्राथमिक शिक्षकांनाही मतदानाचा अधिकार
मिळवून देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करणार.
याप्रसंगी
राज्य संघाचे अध्यक्ष अंबादासजी वाजे, समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर काठोळे,शिक्षक संघाचे राष्ट्रीय सचिव बाळासाहेब झावरे, कार्यकारी
अध्यक्ष म.ज.मोरे, सरचिटणीस आबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष उत्तमराव वायाळ, राज्य सदस्य मिलिंद
गांगुर्डे, घाडगे, संजय भोर, किरण भुजबळ, विजय लंके व आशा गाडगे ( लंके) इत्यादी
पदाधिकाऱ्यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
0 टिप्पण्या