लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर : - बाहेरील खाद्यपदार्थ खाण्याचे प्रमाण सध्या मोठ्याप्रमाणात वाढले आहे. हॉटेल व हातगाड्यांवर विकले जाणारे अन्नपदार्थ हे स्वच्छ असावेत, स्वच्छ जागेत तयार केलेले असावे यासाठी हायजीन फर्स्ट शहरात काम करत आहे. हायजीन फर्स्टने खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये जनजागृती केल्यानंतर आता नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती चळवळ सुरु केली आहे. विद्यार्थ्यांना जर लहानपणीच हायजीन अन्ना बाबत जागृत केले तर ते निरोगी जीवन जगतील. निरोगी जीवनासाठी नागरिकांनी स्वच्छ अन्नास जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा, असे आवाहन हायजीन फर्स्ट संस्थेचे सदस्य प्रा. गिरीश कुकरेजा यांनी केले.
स्वच्छ अन्नासाठी जनजागृती करणाऱ्या हायजीन फर्स्ट संस्थेच्या वतीने बुरूडगाव मधील जनजीवन माध्यमिक विद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्वच्छ खाद्यपदार्थां बाबत प्रबोधन करण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हायजीन फर्स्टच्या सदस्या वैशाली गांधी व प्रा.गिरीश कुकरेजा यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना हायजीन अन्ना बाबत मार्गदर्शन केले. यावेळी हायजीन फर्स्टच्या सदस्या वैशाली मुनोत, शाळेचे मुख्याध्यापक मंगेश झिने, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका आरती गिरवले, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा अर्पिता शिंगवी, माजी अध्यक्षा प्रगती गांधी, सदस्या भाविका चंदे, नीलम भंडारी आदींसह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.
वैशाली गांधी म्हणाल्या, ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना स्वच्छतेची अधिक शिकवण देणे गरजेचे आहे. अन्नपदार्थ खाण्या आधी हातपाय धुणे हि आपली संस्कृती आहे. त्यामुळे शाळेत व घरी हातपाय धुवूनच जेवण करावे. हे सांगण्याची पुन्हा गरज निर्माण झाली आहे. नागरिकांना हॉटेल व हातगाड्यांवर उच्चदर्जाचे, स्वच्छ हातांनी व स्वच्छ जागेत तयार केलेले अन्नपदार्थ मिळावेत यासाठी हायजीन फस्ट अनेक वर्षापासून काम करत आहे. नागरिकांप्रमाणे आता विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी हायजीन अन्ना बाबत माहित देत आहे. बुरूडगाव मध्ये आता विद्यार्थी आपापल्या घरी स्वच्छ अन्नासाठी आग्रही भूमिका घेवून आरोग्याची काळजी घेतील.
जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका आरती गिरवले यांनी हायजीन फर्स्ट टीमने विद्यार्थ्यांना स्वच्छते बाबत चांगले ज्ञान दिल्याबद्दल हायजीन टीमचे आभार मानले
0 टिप्पण्या