Ticker

6/Breaking/ticker-posts

भारत पेट्रोलियम वतीने ट्रक ड्रायव्हरच्या वारसास ५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नगर – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने स्मार्टफ्लिट कार्ड योजने अंतर्गत कार्ड धारक ट्रक ड्रायव्हरचा ५ लाख व क्लीनरचा २ लाख  रुपयांचा मोफत अपघाती विमा उतरविण्यात येतो. नगरमधील निंबळक बायपास रोडवरील  स्वयम् सिया पेट्रोलियम पंपचे ग्राहक पद्मावतीदेवी स्टील यांनी स्मार्टफ्लिट कार्ड योजना घेतलेली आहे. त्यांचा ट्रक  ड्रायव्हर ज्ञानदेव बडे यांचा ट्रक अपघातात मृत्यू झाला होता. त्यांचा अपघाती मृत्यूचा क्लेम भारत पेट्रोलियमच्या वतीने मंजूर करून त्यांच्या वारसास ५ लाख रुपयांचा धनादेश कंपनीचे विभागीय व्यवस्थापक सुधीर कानला यांच्या हस्ते देण्यात आला. या कंपनीचे विभागीय समन्वयक कीर्तीकुमार सिंधानी, अकोळनेर डेपोचे मॅनेजर निरंजन यादव, विक्री व्यवस्थापक अमितकुमार राय, इंजिनिअर रविराज दास, स्वयम् सिया पेट्रोलियम पंपचे संचालक प्रमोदकुमार पाठक आदींसह विविध ट्रान्सपोर्टचे संचालक उपस्थित होते.


         सुधीर कानला म्हणाले, राज्यात पेट्रोल व डिझेल विक्रीत भारत पेट्रोलियम सर्वात आघाडीवर आहे. कंपनीच्या या यशात सर्व ग्राहकांचे प्रमुख सहकार्य आहे. सध्याच्या डिजिटल युगात सुटसुटीत पणे ई पेमेंट होण्यासाठी कंपनीने ट्रान्सपोर्ट ग्राहकांसाठी स्मार्टफ्लिट कार्ड योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत ट्रक ड्रायव्हर व क्लीनरचा मोफत अपघाती विमा केला जातो. ट्रक ड्रायव्हर हे सर्वसामान्य कुटुंबातील असतात. त्यांचा जर अपघाती मृत्यू झाल्यावर त्यांच्या कुटुंबाची काळजी घेत वारसास भारत पेट्रोलियमच्या वतीने फुल न फुलाची पाकळी म्हणून ५ लाखाचा क्लेम देत आहे. या योजनेचा फायदा सर्व ट्रान्सपोर्ट ग्राहकांनी घ्यावा. पंप चालक प्रमोदकुमार पाठक यांनी केलेल्या पाठपुराव्या मुळे या क्लेमला त्वरित मंजुरी मिळाली.\


प्रास्तविकात प्रमोदकुमार पाठक म्हणाले, भारत पेट्रोलियम कंपनी आपल्या ग्राहकांबरोबरच त्यांच्या वाहन चालक आणि त्याचा मदतनीस यांची देखील काळजी घेत आहे. कंपनीने आणलेली स्मार्टफ्लिट कार्ड योजना खूप फायदेशीर आहे.  स्वयम् सिया पेट्रोलियम पंपचे अनेक ट्रान्सपोर्ट ग्राहक या योजनेत सहभागी झालेले आहेत. इतरांनीही या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


       यावेळी पद्मावतीदेवी स्टील कंपनीचे संचालक दिपक नागरगोजे, अनिल नागरगोजे, किशोर कोठारी आदींसह ग्राहक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या