नगर कॉलेजमध्ये
आधार कार्डशी मतदान ओळखपत्र जोडणी अभियान
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर
-लोकशाही सक्षम
करण्यासाठी मतदानातील प्रत्यक्ष सहभागी व्हावे. राजकारणातील गुन्हेगारीकरण या
गोष्टी दुर करण्यासाठी लोकशाहीत
मतदार नोंदणी करणे, मतदार यादी अद्यावत करणे, आता एक पाऊल पुढे जाऊन आधार कार्ड हे मतदान ओळखपत्राशी जोडणे हे
महत्त्वाचे झाले आहे. युवकांनी याबाबत पुढाकार घेऊन जास्तीत जास्त मतदान कार्ड
आधार कार्डशी लिंक करून घेणे गरजे आहे, असे प्रतिपादन
प्राचार्य आर.जे बार्नबस यांनी व्यक्त केले.
अमहदनगर
महाविद्यालयात आधार कार्डशी मतदान ओळखपत्र जोडणी अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी
डॉ.आर.जे.बार्नबस बोलत होते. यावेळी मतदान ओळखपत्र आधार
कार्डशी लिंक करताना कसे लिंक करावे, यासंबधीच्या विविध
पायर्या आणि त्याबद्दलची माहिती उपस्थीत विद्यार्थी ,विद्यार्थिनी
प्राध्यापक यांना विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.भागवत परकाळ यांनी दिली.
सदरील
कार्यक्रमचे आयोजन विद्यार्थी विकास मंडळ अहमदनगर महाविद्यालय अहमदनगर व तहसिल
कार्यालय निवडणूक विभाग अहमदनगर यांनी केले. याप्रसंगी नायब तहसीलदार निवडणूक
तहसील कार्यालय अहमदनगरचे महादेव गायकवाड उपस्थित होते . तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रीतम
कुमार बेदरकर, उपप्राचार्य सय्यद रज्जाक, प्रबंधक रजिस्टार दिपक अल्हाट, प्रा. डॉ. रुचा शर्मा,
प्रा. डॉ. संतोष देशमुख,
प्रा. डॉ. माधव जाधव ,प्रा. डॉ पराग कदम,
प्रा . समिर मोहपात्रा, राष्ट्रीय सेवा योजना
अधिकारी पवनजी छाबडा, प्रा. डॉ. सत्ताप्पा चव्हाण , आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या