Ticker

6/Breaking/ticker-posts

ज्यांना धड पार्टी जोडता येईना, ते देश काय जोडणार ?




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क

संगमनेर- दि ३० सप्टेंबर २२

ज्यांच्याकडे नेतृत्व क्षमता, समज नाही ते आज देशभरात काँग्रेसची यात्रा घेवून निघाले आहेत. मात्र जे पार्टी जोडू शकत नाहीत ते देश काय जोडणार अशा शेलक्या शब्दात अन्न प्रक्रीया उद्योग आणि जलशक्ती विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी  काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली

          

शिर्डी लोकसभा मतदार संघातील सर्वच विधानसभा मतदारसंघाचा दौरा केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल व राज्याचे महसूल आणि दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला  त्यानंतर ते संगमनेर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.


यावेळी त्यांनी काँग्रेसच्या सध्या सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेवर खरमरीत टीका करताना, पटेल म्हणाले की, या पक्षाकडे आता नेतृत्वच राहिलेले नाही. सत्तेपासून दूर गेल्यामुळे हा पक्ष बेचैन झाला आहे. ८० वे दशक असो की आत्ताचे, ज्या-ज्या वेळेस काँग्रेस सत्तेपासून दूर गेली त्या त्या वेळेस काँग्रेसने राष्ट्रविरोधी शक्तीशी हातमिळवणी करण्यासही मागे पुढे पाहिले नाही. असा गंभीर आरोप केला.


पीएफआय संघटनेवर या सरकारने बंदी घातल्यानंतर कोणतीही प्रतिक्रीया काँग्रेस  पक्षाकडून पुढे आल्याचे दिसत नाही. त्यामुळेच या पक्षाला देशापेक्षा स्वत:च्या अस्तित्वाची अधिक चिंता असल्याचा खोचक टोला केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी काँग्रेसला लगावला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या