Ticker

6/Breaking/ticker-posts

सोनवणे वस्तीवर सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; तीन लाखाचा ऐवज लंपास, झटापटीत ३ जण गंभीर जखमी






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)  

 कोपरगाव  दि. १५ सप्टेबर २०२२

तालुक्यातील संवत्सर शिवारातील नऊ चारी येथे सात दरोडेखोरांनी चाकू, लोखंडी गज, लाकडी दांडके याचा धाक दाखवून मारहाण करून मध्यरात्री सुमारे तीन लाख रुपये किमतीचा धाडसी दरोडा टाकून ऐवज चोरून नेल्याची घटना घडली असून यावेळी दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत तीन जण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालय तसेच शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. झालेल्या प्रकारामुळे या भागात मोठी दहशत पसरली वाड्यावर त्यावरील रहिवासी भयभित झाले आहेत.



 घटनास्थळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट देऊन तपासाची चक्र जलद केली आहे. घटनास्थळी ठसे तज्ञ  डॉग युनिटला पाचारण करण्यात आले होते. 

         

 याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक १५ रोजी मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास नवचारी संवत्सर शिवारात  गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या वस्तीजवळ शेतकरी अनिल हरिभाऊ सोनवणे यांची वस्ती आहे, वस्तीवर ६-७ जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने चाकु लोखंडी गज लाकडी दांडके याचा धाक दाखवून घरात प्रवेश करून घर मालक अनिल सोनवणे यांच्यावर चाकू हल्ला करून त्याच्या घरातील आधार कार्ड एटीएम कार्ड पाकीट मोबाईल तसेच सोन्या चांदीचे दागिन्यासह रोख ऐवजासह सुमारे २ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असून केलेल्या मारहाणीत दोन महिलांना जखमी केले आहे. 


जखमी मध्ये अनिल हरिभाऊ सोनवणे वय ५४ सुगंधाबाई हरिभाऊ सोनवणे वय ७८ व सुनिता बबन सोनवणे वय ५२ वर्ष यांचा समावेश आहे. सुमारे पाउन तास चाललेल्या दरोडाच्या नाट्यनंतर चोरी करून दरोडेखोरांनी पोबारा केला . 


या प्रकारामुळे संवत्सर शिवारात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी सौ कविता अनिल सोनवणे वय पन्नास वर्ष यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे, पोलिसांनी सात अनोळखी ईसमा विरुद्ध दरोड्याचा गुन्हा नोंद केला आहे.  

                         

 सोनवने कुटुंबीय रात्री झोपले असताना अनिल सोनवणे हे लघुसंखेसाठी उठले असता त्यांना खिडकी वाजल्याचा आवाज आला म्हणून ते पहावयास गेले असता त्यांना सात दरोडेखोर दिसून आले, आरडाओरड केला असता त्यांनी दमबाजी करत गप्प बसा नाहीतर तुम्हाला मारून टाकू असे सुनावल्यानंतर कटवनी ने दरवाजा तोडून आत प्रवेश करून हा जब री दरोडा टाकला. घटनास्थळी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने उपसरपंच विवेक परजणे व गावकऱ्यांनी भेटी देऊन सोनवणे कुटुंबीयांचे धीर दिला. व परिसरात रात्री पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी केली.


 पोलिसांनी दरोडेखोरांच्या तपासासाठी पथके  पाठवले असून दरोडेखोरांचा तपास करू व त्यांना जेरबंद करू असे आश्वासन पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या