Ticker

6/Breaking/ticker-posts

“तुका म्हणे जेंव्हा फिरते कपाळ। तेंव्हा अमंगळ योग येतो।।’ महंत डाॅ. नामदेवशास्त्री

 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

खरवंडी कासार:- दि. २९

 सप्टेंबर २०२२

“संभाव्य दसरा मेळाव्यासंदर्भात कोणतीही चर्चा असली तरी भगवानगडच काय, गडाच्या आसपास असलेल्या गडमालकी हद्दीतील कोणत्याही जागेत कसलाही मेळावा होणार नाही. नो ... नेव्हर’ असे रोखठोक उत्तर भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांनी बोलताना दिले. 


याबाबत आपण तालुका प्रशासनाला पत्र दिले असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही राजकीय वादात गडाला ओढू नका, असे सांगताना त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील “तुका म्हणे जेंव्हा फिरते कपाळ। तेंव्हा अमंगळ योग येतो।।’ अशी रचनाही म्हटली. मात्र, यातून त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता हे स्पष्ट केले नाही ..



भगवानगडावर १६ संघटना मिळून दसरा मेळाव्याचे आयोजन करत असल्याची चर्चा सुरू आहे. या आयोजनामागे गडाची म्हणजे महंतांची छुपी ताकद आहे, असेही म्हटले जात आहे. त्याबाबत त्यांना विचारले असता .तेव्हा ते म्हणाले, दसरा मेळावा म्हणजे सीमोल्लंघन सोहळा असतो. ती गडाची सांस्कृतिक - धार्मिक परंपरा आहे. असा सोहळा म्हणजे गडाची एक प्रकारे मालमत्ता आहे. गडाच्या संमतीशिवाय असा कोणताही मेळावा होऊ शकत नाही. राजकीय प्रवाहांपासून गड अलिप्त ठेवायचा हे धोरण आहे. त्यात कसलाही बदल झालेला नाही. गडाची शांतता व परंपरेला बाधा पोहोचू नये यासाठी आपण तालुका प्रशासन व पोलिस प्रशासनाला कळवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेक वर्षांपासून मुंबई आणि भगवानगड असे दोनच दसरा मेळावे राज्यभर चर्चेचा विषय ठरतात. मुंबईत ठाकरे, तर भगवानगडावर गोपीनाथ मुंडे परिवाराभोवती चर्चा फिरत राहते. अलीकडेच आमदार सुरेश धस यांच्या पुढाकाराने मायंबा सावरगाव येथे दसरा मेळावा सुरू झाला. भगवानगडावर पूर्वी गडाच्या सुमारे शंभर किलोमीटर परिसरातील भाविक दसऱ्याला सीमोल्लंघनासाठी येत. त्यात ऊसतोडणी कामगारांची संख्या जास्त असे. माजी मंत्री बबनराव ढाकणे यांच्या प्रभुत्वाखालील ऊसतोडणी कामगार संघटनांमधील शीतयुद्धाचा भडका युती सरकारच्या काळात भगवानगडावर उडाला होता. त्यामुळे डॉ. नामदेवशास्त्री यांनी भगवानगडावरील मेळाव्यामध्ये राजकीय नेत्यांच्या भाषणांना बंदी घालून मूळ स्वरूपात सोहळा सुरू केला.


१६ संघटनांनी प्रथमच केली मेळाव्याची जोरदार तयारी चार वर्षांपूर्वी विविध मार्गांनी प्रयत्न करूनही मेळाव्याला पुन्हा परवानगी मिळत नाही असे लक्षात येताच पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडाकडे समर्थकांचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. पण भाविकांची श्रद्धा फक्त भगवानबाबांभोवतीच आहे याचा अंदाज येऊन त्यांनी बाबांचे जन्मगाव असलेल्या सुपे सावरगाव येथे हा मेळावा सुरू केला, तर इतर १६ संघटनांचे लक्ष भगवानगडाकडे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या