लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुका अध्यक्षपदी येथील धडाडीचे युवा वार्ताहर सचिन सातपुते यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. शिर्डी येथे शुक्रवारी (दिं.23 रोजी) पार पडलेल्या मराठी पत्रकार संघाच्या मेळाव्यात प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे यांनी याबाबतची घोषणा केली. निवडीनंतर जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते,अनिल रहाणे यांच्या हस्ते श्री.सातपुते यांचा सत्कार करण्यात आला.
श्री.सातपुते यांनी सन 2006 ला प्रेस फोटोग्राफर म्हणून पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण केले. हरहुन्नरी फोटोग्राफर म्हणून त्यांनी जिल्ह्यात नाव कमावले. विविध वृत्तपत्रातून त्यांची बोलकी छायाचित्रे प्रसिद्ध झाली. नंतरच्या काळात त्यांनी स्वतंत्र पत्रकार म्हणून विपुल लिखाण केले. मुख्यत्वे रस्ते, वीज, पाणी या प्रश्नावर त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. शेती व शेतकऱ्यांची व्यथाही त्यांनी मांडली.
यावेळी निवड समिती अध्यक्ष सोमनाथ काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य नीलकंठ कराड, जिल्हा कार्याध्यक्ष सूर्यकांत नेटके, भाऊसाहेब वाकचौरे, चंद्रकांत झुरंगे, दत्ता घाडगे, अरुण सोनकर, विद्याचंद्र सातपुते, लियाकत शेख आदी मान्यवर पत्रकार उपस्थित होते.
' श्रद्धा व सबुरी ' ने जबाबदारी पेलवू...!
योगायोगाने शुक्रवारी आपला वाढदिवस आल्याने ब्रम्हांडनायक सच्चिदानंद सद्गुरु श्री साईबाबांच्या पावनभूमीत तालुकाध्यक्षपदाची धुरा खांद्यावर आ्ली आहे. ' श्रद्धा सबुरी 'ची शिकवण देणाऱ्या बाबांच्या आशीर्वादाने ही जबाबदारी आपण समर्थपणे पेलवू.
- सचिन सातपुते
शेवगाव तालुक्यात पत्रकाराची संघटना अधिक भक्कम व मजबूत करून संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावले जातील तसेच सर्व पत्रकारांना न्याय दिला जाईल,अशी ग्वाही श्री.सातपुते यांनी दिली.त्यांच्या निवडीबद्दल शेवगाव तालुक्यातील पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले.
0 टिप्पण्या