लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
संगमनेर :-
धर्माच्या नावावर पाकिस्तानची निर्मिती झाली होती, मात्र आता हिंदू धर्माच्या नावावर देश बनविण्याचे काम केंद्रातील मोदींच्या सरकारने सुरू केली असल्याची खरमरीत टीका राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे अध्यक्षपदाचे दावेदार अशोक गेहलोत यांनी केली
सहकारातील ज्येष्ठ नेते सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, हरित क्रांतीचे प्रणेते डॉअण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महो त्सवाचे औचित्य साधून थोर विचारवंत अ ह साळुंखे यांना भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार ज्येष्ठ कृषीतज्ञ डॉ सुधीर भोंगळे यांना कृषी क्रांतीचे प्रणेते अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार तसेच माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना सहकारातील नेतृत्व पुरस्कार राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री छगनराव भुजबळ , विधिमंडळ पक्षाचे गटनेते नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे आदींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
ना. गेहलोत पुढे म्हणाले की, सध्या देशामध्ये मोदी सरकारमुळेमहागाई बेरोजगारी वाढलेली आहे . ईडीचे हत्यार उपसल्यामुळेच महाराष्ट्रात शिवसेनेचे ५० आमदार पळाले , गोव्यात सुद्धा गुरा ढोरासारखे आमदार विकले गेले आहे तसेच जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी लोकपाल आणले , मात्र आज लोकपाल आणि अण्णा हजारे कुठे आहेत, ते सुद्धा दिसत नाही, यावर मात्र कोणी काहीच का बोलत नाही? असा सवाल गेहलोत यांनी मोदी सरकारला केला आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो आंदोलनाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे देशातील वातावरण बदलू लागले आहे, असा दावा करून आपण येथून गेल्यानंतर जयपूरला जाणार आणि तेथून दिल्लीला जाणार आहे. त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याबाबतचा प्रस्ताव गांधी परिवारासमोर ठेवणार आहे. त्यांनी होकार दिल्यानंतर अध्यक्षपदाची निवड णूक लढविणार असून अध्यक्षपदाची माळ तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्याच पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, देशात राष्ट्रवादीसह भाजप शिवसेना व इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा अध्यक्ष निवडला जात असताना फारशी चर्चा होत नाही. मात्र, काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीवेळी मोठी चर्चा का होते? असा सवाल उपस्थित करून, काँग्रेसला नेहरु, गांधी घराण्याचा इतिहास आहे. हा इतिहास घराणेशाहीचा नसून बलिदानाचा इतिहास आहे. असे त्यांनी ठणकाऊन सांगितले.
0 टिप्पण्या