Ticker

6/Breaking/ticker-posts

ऋषितुल्य व्यक्तींच्या कर्तृत्ववाने नगर समृध्द : पोलीस अधिक्षक मनोज पाटील




 रसिक ग्रुपच्या वतीने १२ ऋषितुल्य व्यक्तींचा मानपत्र देऊन सन्मान

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नगरपोलिसांच्या जीवनात सकारात्मक घटना व कार्यक्रम खूप कमी असतात.  आदर्शवत अशा ऋषितुल्य व्यक्तींचा सन्मान करण्याचे भाग्य मला रसिक ग्रुपमुळे मिळाले, सर्व सत्कारार्थींच्या विविध क्षेत्रातील उतुंग कामगारीने नगर शहराला समृद्ध केले आहे. त्यांच्या आयुष्यभराच्या कर्तृत्वाने नगर शहराला वेगळी ओळख व आदर प्राप्त झाला आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी केले.

नगरच्या  सांस्कृतिक चळवळीत भरीव योगदान देणाऱ्या रसिक ग्रुपच्या वतीने ऋषीपंचमी निमित्त नगर शहराच्या प्रगतीत अमूल्य योगदान देणाऱ्या १२ ऋषितुल्य व्यक्तींना जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते मानपत्र देवून विशेष सन्मानित करण्यात आले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. संग्राम जगताप होते. यावेळी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.  शिरीष मोडक, प्रेमराज बोथरा, आय. एम. खान, निळकंठ देशमुख, घनश्याम शेलार, 'चे राजेंद्र उदागे, सुनील मुनोत, रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.


या सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद मिरीकर, ज्येष्ठ चित्रकार वसंत विटणकर, साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. मुहंमद आझम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिका मेधा काळे, ज्येष्ठ प्राध्यापक श्रीकांत बेडेकर, ज्येष्ठ नेते किसनराव लोटके, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, मर्चंट बँकेचे ज्येष्ठ संचालक हस्तीमल मुनोत, सामाजिक कार्यकर्ते शशीकांत मुथा, ज्येष्ठ प्राध्यापक मधुसूदन मुळे व रणजीपटू बाबा चांदोरकर आदी ऋषितुल्य व्यक्तींचा शाल, पुष्पहार, ग्रंथ, मोरपीस व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. 

मनोज पाटील पुढे म्हणाले, या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिक ग्रुपने सर्व सत्कारार्थीं प्रती आदर व्यक्त करून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न येथे केला आहे. राकिक ग्रुपच्या या चांगल्या कार्यक्रमामुळे नवी पिढी व आम्ही या व्यक्तींचा आदर्श घेवू. सर्व सत्कारार्थींनी आपल्या कर्तृत्वाने नगरला एक सांकृतिक शहर म्हणून जी ओळख निर्माण करून दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. तुमचे कार्य नवी प्रेरणा व उमेद देणारे आहे. माझ्या आयुष्यात असे सकारात्मक उर्जा देणारे कार्यक्रम खुप कमी घडले आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम कायम स्मरणात राहील. या कार्यक्रमाबद्दल जयंत येलुलकर यांचे भरपूर कौतुक करतो. गेल्या दोन वर्षापासून नगरचा पोलीस प्रमुख म्हणुन काम करतना नगर शहराची खरी ओळख रसिक ग्रुपमुळेच  झाली आहे. असे त्यांनी सांगितले.


यावेळी आ. संग्राम जगताप म्हणाले, नगर शहरात नावाजलेले अनेक महान व्यक्तिमत्व होवून गेले आहेत. जुन्या पिढीचे कार्य नव्या पिढीला बऱ्याचदा माहिती नसते. हे कार्य नव्या पिढी पर्यंत आले पाहिजे. याच तळमळीने जयंत येलुलकर कायम प्रयत्नशील असतात. कर्तृत्ववान ऋषितुल्य व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या विचारांची ज्योत रसिक ग्रुपने पेटवून ठेवली आहे. नगरचे नावलौकिक वाढवण्यात या सर्व व्यक्तींचे भरीव योगदान आहे. तुमच्या पासूनच आदर्श घेवून माझ्या सारखी नवी पिढी काम करत आहे. रसिक ग्रुप कायम नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहे. मान्यवरांच्या घरावर नीलफलक लावणे हा कौतुकास्पद उपक्रम आहे. माणसातील माणूसपण हरवत जात असताना अशा सकारात्मक विचारांच्या कार्यक्रमामुळे माणसे जोडली जात असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

            

प्रा.शिरीष मोडक, डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे, प्रा.मधुसूदन मुळे, बाबा चांदोरकर, किसनराव लोटके  आदींनी आपले विचार यावेळी व्यक्त केले. यावेळी ज -म्हणजे जिद्द, य- म्हणजे यश व त- म्हणजे तपश्चर्या अशा शब्दात निळकंठ देशमुख यांनी जयंत येलुलकर यांच्या कार्याचा गौरव केला. 


कार्यक्रमच्या प्रास्ताविकात संयोजक जयंत येलुलकर म्हणाले, या शहराच्या प्रगतीत व सांकृतिक, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, साहित्यिक, आर्थिक अशा सर्व क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या व्यक्ती आपल्या नगर शहराचे भूषण आहेत. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने या शहराला मोठ व समृद्ध केले अशा सर्व ऋषितुल्य व्यक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा रसिक ग्रुपच्या वतीने सन्मान आज केला आहे. दरवर्षी अशा व्यक्तींचा सन्मान रसिक ग्रुप करणार आहे. नगर शहराला मोठी ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी आहे. मात्र ज्या पद्धतीने शहराचे पर्यटन वाढणे आवश्यक होते ते झालेले नाहीये, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. शहराचे पर्यटन वाढावे यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. अशी अपेक्षा व्यक्त केली.

       

गायक पवन नाईक यांच्या ईशस्तवनाने कार्यक्रमास सुरवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रसाद बेडेकर यांनी केले. गणेश भगत यांनी मानपत्रांचे वाचन केले. सुदर्शन कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी कवी चंद्रकांत पालवे, बाळासाहेब नरसाळे, निखील डफळ, समीर पाठक, विनायक वराडे, श्रीकृष्ण बारटक्के, हनीफ शेख, तेजा पाठक, प्रशांत अंतेपेल्लू, प्रशांत देशपांडे, मेहमूद शेख, ऋषिकेश येलुलकर आदींनी परिश्रम घेतले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या