Ticker

6/Breaking/ticker-posts

युवा कार्यकर्त्यांचे सामाजिक काम कौुकास्पद- महेश तवले ; गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

 


अष्टविनायक मित्र मंडळ व स्व. सुभाष तवले मित्र मंडळ  आयोजित स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)  

नगर :- अष्टविनायक मित्र मंडळ व स्व. सुभाष तवले मित्र मंडळाच्या  कार्यकर्त्यानी गणेशोत्सव काळात राबविलेले विविध सामाजिक उपक्रम कौतकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी नगसेवक व भाजयुमोचे उपाध्यक्ष महेश तवले यांनी केले.


येथील औरंगाबाद रोड वरील आदर्श शाळे मागील अभियंता, नंदनवन कॉलनीतील अष्टविनायक मित्र मंडळ व स्व. सुभाष तवले मित्र मंडळाच्यावतीने आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण महेश तवले यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक  व   मार्गदर्शक विष्णुपंत गवळी,  म्हातारदेव पालवे, प्रा. गायकवाड, प्रा. आंधळे, जाधव, गिरीश तवले, विष्णू तवले, सुदर्शन हेंद्रे, डॉ. जंगले, डॉ. जावळे, धनराज  दाळवाले आदी मान्यवर उपस्थित होते.


पुढे बोलताना तवले म्हनाले की, सर्व समाजाला एकत्र आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. त्यामुळे ख-या अर्थाने परस्परात संवाद होऊन सामाजिक ऐक्य साधले गेले आहे. या मंडळाचे पदाधिकारी हे युवक असून त्यांनी सलग ९ दिवस विविध समाज उपयोगी कार्यक्रम साजरे केले. त्यांचे हे काम खरोखर चांगले आहे, ही परंपरा यापुढे चालू ठेवावी त्यासाठी आपण सर्व तोपरी सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली.


स्पर्धेत परिसरातील मुले, मुली व  महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. यावेळी विजेत्यांना  महेश तवले व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. शेवटी टोलेजंग मिरवणुकीने गणेश विसर्जन करण्यात आले.



या सर्व कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष

यश पालवे , उपाध्यक्ष संजय दाळवाले ,प्रशांत पवार, प्रदीप ससे, वैभव पालवे, महेश साबळे, अजिंक्य पालवे , मोहन खेडकर , राजवर्धन सुरवसे , कुणाल साबळे, पवन शेळके, प्रतीक ढमढेरे , कृष्णा गाडे , सौरभ काळे , प्रथमेश पवार , चैतन्य पवार ,ब्रह्मा काळे, गुरु काळे , मयूर निंबाळकर, सुजल नकवाल , सूरज घुमरे,आदित्य हेंद्रे , आदित्य जावळे , यश जावळे, तेजस रासकर , प्रणव पुंड, पवन मिसाळ,सार्थक मिसाळ आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्याबद्दल त्यांचा महेश तवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.






गणेश विसर्जन मिवणुकीत सहभागी महिला मंडळ


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या