लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर-वाढदिवसानिमित्त झाडांची लागवड करणे म्हणजे खूप मोठे पुण्याचे काम आहे, वृक्षारोपण काळाची गरज आहे . असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
लोक वाढदिवसाला फालतू खर्च करतात परंतु तलाठी गणेश जाधव यांनी एक आदर्श जनतेसमोर ठेवला आहे. असे सांगीतले.
यावेळी शिवाजी पालवे यांनी तलाठी गणेश जाधव यांना शुभेच्छा देऊन कौतुक केले वृक्षामुळे पृथ्वीवरील प्रत्येक सजीव आनंदी आहे जिवंत आहे वृक्षामुळेच बळीराजा आनंदी राहतो म्हणून वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे .
जाधव यांनी जय हिंद फाउंडेशन अहमदनगर च्या माध्यमातून होत असलेल्या वृक्ष चळवळीचा भाग म्हणून वाढदिवसानिमित्त जय हिंदची ही प्रेरणा आपण स्वीकारली असून येणाऱ्या काळात देखील वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा करणार असल्याचे सांगून उपस्थित सर्वांचे आभार मानले
बुऱ्हानगरचे तलाठी गणेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त २१ वडाचया झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले .
याप्रसंगी वारूळवाडीचे सरपंच सागर कर्डिले जय हिंदचे शिवाजी पालवे शिवाजी गर्जे , अर्जुन साठे, मा.सरपंच शंकर पवार , डायरेक्टर से.सो.राहूल वारुळे, संतोष वारुळे ,भागा पवार पाचेगाव सेवा सोसायटीचे चेअरमन सुधाकर शिंदे , संचलक नांदे , दिलीप वाघचौरे, मा. जि. प. सदस्य अरुण वाघचौरे, मा. सरपंच दीपक धनगे ,भाऊसाहेब दारकुंडे अनिल भगत दत्तू दुसूगे आदी उपस्थित होते .
वारुळवाडी गावचेचे सरपंच सागर कर्डिले यांनी ग्रामपंचायत वारूळवाडी झाडांचे पालकत्व स्वीकारले असून येणाऱ्या काळात जबाबदारीने सर्व झाडे जगवणारा असल्याचे आश्वासन दिले.
0 टिप्पण्या