Ticker

6/Breaking/ticker-posts

नगरच्या 'या' झुंजार महिलेची राष्ट्रीय राजकारणात धमाकेदार एंट्री









मंगल भुजबळ बनल्याया राष्ट्रीय कॉंग्रेसच्या ओबीसी   सहसमन्वयक व

राजस्थानच्या सहप्रभारी 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )                                                 

अहमदनगर  अहमदनगर जिल्ह्यातून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या कोअर कमिटी सदस्यपदी कार्यरत असलेल्या  झुंजार महिला नेत्या मंगलताई भुजबळ यांची राष्ट्रीय कॉंग्रेसच्या ओबीसी विभाग सहसमन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच  त्यांच्यावर राजस्थान राज्याच्या सहप्रभारी म्हणून देखील जबाबदारी देण्यात आली आहे. तसे नियुक्तीपत्र दिल्लीवरून प्रसिध्द करण्यात आले आहे.  राष्ट्रीय स्तरावर एकाचवेळी महत्त्वाच्या दोन जबाबदाऱ्या म्हणजे त्यांच्या धडाकेबाज कामाचा हा एकप्रकारे गौरव केल्याचे मानले जात आहे.


 कॉंग्रेस पक्ष्याच्या अध्यक्षा सोनिया गांधी  यांच्या मान्यतेने व राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांच्या स्वाक्षरीने   कॉंग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवर ओबीसी विभागाच्या समन्वयक व सहसमन्वयकपदी नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या.  त्यात महाराष्ट्रातून अहमदनगर च्या सौ. भुजबळ यांना ही संधी मिळाली आहे.


भुजबळ यांनी वयाच्या 23 व्या वर्षी युवक कॉंग्रेस च्या माध्यमातून राजकीय सुरुवात करून अ.नगर शहर ,अ.नगर ग्रामीण जिल्हा व महाराष्ट्र प्रदेश पर्यंत त्यांनी कॉंग्रेस पक्ष्यांत विविध पदावर काम करून या 15 वर्षाच्या राजकीय कार्यकाळात त्यांनी स्वबळावर आता डाइरेक्ट राष्ट्रीय राजकारणात एंट्री केली आहे. कॉंग्रेस पक्ष्यात अतिशय निडर, धडाडीच्या ,कोणत्याही विषयाचा दांडगा अभ्यास,उत्तम संघटन कौशल्य, दांडगा जनसंपर्क अशी पक्ष्यात त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. कायम दुष्काळी तालुका अशी ओळख असलेलल्या जामखेड तालुक्यातून कोणी महिला कुठलाही राजकीय वारसा नसताना स्वकर्तृत्वाच्या बळावर राष्ट्रीय राजकारणात एंट्री मारेल ही कल्पना जशी अश्यक्यप्राय गोष्ट असली तरी पक्ष्यात धडाडीने काम केल्यास पक्ष नक्कीच त्याची दखल घेतो याचाच प्रत्यय आलाय 


जामखेड तालुक्यातील जवळा गावच्या लेकीला म्हणजेचं मंगल भुजबळ - हजारे  यांना. त्यांच्याकडे असलेल्या नेत्रुत्वाची व अभ्यासू व्रुतीची तसेच कॉंग्रेस शी असलेल्या प्रामाणिकपणाची वरिष्ठांनी दखल घेत त्यांना राष्ट्रीय राजकारणात काम करण्याची मोठी संधी दिली आहे. निश्चित ध्येय, सामाजिक प्रश्नांची अचूक जाण, कोणत्याही संकटाला निर्भीडपणे सामोरे जाण्याचे धैर्य तल्लख बुध्दीमत्ता अन तळमळ हे गुण अंगी असतील तर महीलेला कोणीही यशापासून रोखू शकत नाही,   कोणताही राजकीय वारसा नसताना स्वकर्तृत्वाच्या जोरावर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत असा त्यांचा हा  राजकीय प्रवास आहे. 


त्यांच्या या निवडीबद्दल कॉंग्रेसचे राष्ट्रीय ओबीसी अध्यक्ष अजय सिंग यादव, महाराष्ट्र कॉंग्रेस ओबीसी प्रभारी राहूल यादव, कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, कॉंग्रेस ओबीसी प्रदेशअध्यक्ष भानुदास माळी,  अमित देशमुख,  सुनील केदार, विजय वड्डेट्टिवार, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री वर्षा गायकवाड, महिला प्रदेशअध्यक्ष संध्याताई सवालाखे तसेच प्रदेश चे सर्व पदाधिकारी व प्रदेश चे सर्व फ्रंटल चे पदाधिकारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या