Ticker

6/Breaking/ticker-posts

९९ वर्षाच्या वडझिरकरांनी बनवली हाताने गणपती मुर्ती

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर-मधील  सहादु रामभाऊ वडझीरकर(वय ९९)हे १०  वर्ष वय असताना हाताने गणपती बनवत आहेत.त्यांना आता त्यांचा पुतण्या सुधीर वडझीरकर मदत करत आहे.आतापर्यंत या गणेश मूर्तीमध्ये काहीही बदल झालेला नाही. दरवर्षी नवीन मूर्ती माझ्या आजोबांपासून हीच मुर्तीची प्राणप्रतिष्ठा आम्ही करत आलेलो आहोत. अशी माहिती मिसाळगल्ली येथील निलेश प्रेमशंकर मिसाळ यांनी दिली. 

                     

नगर शहरात स्वकुळसाळी समाजाचे मिसाळ,पाटेकर परिवार,कासार समाजाचे श्री.रासने परिवार व ब्राह्मण समाजाचे श्री. देशमुख  परिवार यांच्या चार पिढ्यांपासून श्री.वडझीरकर कुटुंब मुर्ती बनवत आहेत शाडू व माती यापासून,कुठल्याही प्रकारचा साच्या न वापरता हाताने मुर्ती  बनवतात काळानुरुप प्रत्येक मुर्तीकारांनी अनेक प्रकारचे बदल केले.परंतु वडझीरकर यांनी मूर्तीत बदल केला नाही व त्यांनी पर्यावरण पूरकमुर्ती बनविण्याची कास आजपर्यंत सोडली नाही. 

                     

ही मुर्ती २ ते ३ तासात पाण्यात विसर्जीत होते. त्यापासून पर्यावरणाची काहीही हाणी होत नाही.आम्ही अनेक मुर्तीकारांशी संपर्क केला पण त्यांनी  अशी हाताने मुर्ती बनविण्यासाठी नकार दिला.आज  वडझीरकर यांनी शंभरीत पदार्पण करीत आहेत.आम्ही त्याच्यासाठी सदैव ॠणी आहोत असेही मिसाळ म्हणाले. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या