लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पाथर्डी : दि. १८ सप्टेंबर
सर्वत्र झाडी आणि जंगलांचे अस्तित्व धोक्यात आल्यामुळे ग्लोबल वॉर्मिगचा उदय झाला असून त्यामूळे वातावरणात अनपेक्षित बदल घडून आले आहेत. परिणामी निसर्गचक्र बदलून अवेळी आणि अवकळीचे वातावरण निर्माण झाले आहे, याचा आता अनुभव येत असून हा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका ताई रजले यांनी केले.
आज माणिकदौंडी घाट येथे श्री सतिषशेठ गुगळे सचिव श्री तिलोक जैन विद्यालय पाथर्डी यांनी आयोजित केलेल्या श्री गुरु आनंदवन वृक्ष लागवड संवर्धन व वृक्षारोपण कार्यक्रम शेवगाव -पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुनराव शिरसाठ माजी सभापती काकासाहेब शिंदे माझी पंचायत समिती सदस्य सुनील ओहळ, शिवाजीराव मोहिते पाटील नगरसेविका मंगलताई कोकाटे श्री तीलोक जैन विद्यालयाचे सचिव श्री सतीश शेठ गुगळे विश्वस्त धरमशेठ गुगळे, सुरेशशेठ कुचेरिया,चांदमलजी देसरडा, चितळे महाराज, वनविभागाचे दराडे साहेब, सरपंच मिठू चितळे, शिवनाथ मोरे, राजू मोरे, महादेव रहाटे, मारुती चितळे, पंचक्रोशीतील मान्यवर, शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.
माणिकदौंडी घाट येथे श्री सतिषशेठ गुगळे सचिव श्री तिलोक जैन विद्यालय पाथर्डी यांनी आयोजित केलेल्या श्री गुरु आनंदवन वृक्ष लागवड संवर्धन व वृक्षारोपण कार्यक्रम शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते करण्यात आला.

0 टिप्पण्या