जय हिंद फाउंडेशनचे चासला वृक्षरोपण
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर: देश रक्षणाचे कर्तव्य बजावल्यानंतर पर्यावरण रक्षणासाठी माजी सैनिकांचा पुढाकार प्रेरणादायी आहे. जय हिंद फाऊंडेशनने वृक्षरोपण चळवळीला गती देऊन, जिल्ह्यातील ओसाड होत असलेल्या डोंगर, पर्वतरांगा व मंदिर परिसर हिरवाईने फुलविण्यासाठी सुरु केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपट पवार यांनी केले.
जय हिंद फाउंडेशनच्या वतीने जिल्हाभर सुरु असलेल्या वृक्षरोपण अभियानातंर्गत नगर तालुक्यातील चास येथील श्रीकृष्ण गोशाळा परिसरामध्ये वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी अॅड. अविनाश बुधवंत, ह.भ.प. हरिभाऊ जाधव, सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब ठाणगे, डॉ. प्रताप सोनवणे, डॉ. सतीश ढमढेरे, आधार संकल्प फाऊंडेशनचे जयवंतराव मोटे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जय हिंद फाऊंडेशनचे शिवाजी पालवे यांनी प्रास्ताविकात पर्यावरण संवर्धनासाठी माजी सैनिक योगदान देत असून, देश सेवा या भावनेने वृक्षरोपण व संवर्धनाचा उपक्रम सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अॅड. अविनाश बुधवंत यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षक्रांतीची गरज आहे. माजी सैनिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी उभी केलेली चळवळ प्रेरणा देणारी असून, या चळवळीला युवकांनी हातभार लावण्याचे त्यांनी आवाहन केले.
या वृक्षरोपण कार्यक्रमासाठी जय हिंदचे शिवाजी गर्जे, अशोक मुठे, रामदास घोडके, दादाभाऊ बोरकर, महादेव शिरसाट, विक्रांत संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब भोर, आनंदा घुंगर्डे, तुकाराम घुंगर्डे, अरुण ठाणगे, विनोद काशीद, लक्ष्मण देवकर, अनिल गवळी, प्रकाश वाबळे, अशोक भोर, विनायक कार्ले, महेश कार्ले, अशोक आगरकर, मच्छिंद्र कार्ले आदी उपस्थित होते. यावेळी चिंच, वटवृक्ष, जांभळ, भेंडी, करंज अशी वेगवेगळ्या प्रकारची 41 झाडांची लागवड करण्यात आली.
0 टिप्पण्या