Ticker

6/Breaking/ticker-posts

वॉ.. लय भारी ..! पोटाबरोबरच ज्ञानाचीही भूक भागविण्याची तयारी, हॉटेलमध्येच ग्रंथालय.. !


 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

          अहमदनगर :  माणसाला पोटाची भूक काही सुचू देत नाही, किंबहून' तशीच ज्ञानाची भूक सुद्धा लागली पाहिजे, याचा दुर्मिळ आदर्श वस्तुपाठच एका महिलेने समाजाला घालून दिल्याचे अनोखे उदाहरण समोर आले आहे. 'ग्रंथ हेच खरे गुरु ' मानून मनामनात वाचन संस्कृती रुजविण्याबरोबरच ग्रंथांचा प्रचार व प्रसाराचे कार्य करणाऱ्या ओझरच्या दहाव्या मैलावरील (ता.निफाड,जि.नाशिक) ' हॉटेल रिलॅक्स कॉर्नर 'च्या मालक सौ. भिमाबाई जोंधळे (वय ७५) हे त्या ज्ञान मातेच नाव आहे.



या अनोख्या उपक्रमाची दखल ग्रंथालय विभागाचे अधिकाऱ्यांनी देखील घेतली, हे उल्लेखनीय. औरंगाबादचे (संभाजीनगर) सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, मुख्य लिपिक अनिल बाविस्कर व अहमदनगरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी शनिवारी (दिं.१७) भेट घेऊन भिमाबाईंच्या या अलौकिक कार्याचा गौरव केला. तसेच त्यांचा शाल व पुस्तक भेट देऊन सन्मान केला.


           विविध टीव्ही चॅनेल्स व अँड्रॉइड मोबाईलच्या जमान्यात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे,ती वृद्धिगत होण्यासाठी भीमामाई जोंधळे यांचा पुढाकार वाखणण्यासारखा आहे.त्यांनी ' हॉटेल रिलॅक्स कॉर्नर ' मध्ये मोफत ग्रंथालय सुरू केले आहे. येथे चोखंदळ ग्राहक ' पोटोबा ' बरोबरच वाचनाचीही ' भूक ' भागवत आहेत.त्यांच्या या संकल्पनेला मुलगा प्रवीण व सुनबाई प्रीती जोंधळे यांनी पाठिंबा व प्रोत्साहन दिले.

       या भेटीदरम्यान सौ.जोंधळे यांना दिवंगत महामहीम राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे ' अग्निपंख ' हे वाचनीय पुस्तक तसेच सहाय्यक ग्रंथालय संचालक  सुनील हुसे लिखित ' बोलू ग्रंथ कौतुके ' या काव्यसंग्रहाची प्रत भेट देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या