पोलीस अधिक्षकांना भाजपाचे निवेदन
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर - भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वैयक्तिक फेसबुकवर नगर शहरातील संदीप खामकर या व्यक्तीने अक्षेपार्ह मजकूर लिहून अपशब्दात टिप्पणी करून त्यांची बदनामी केली आहे. संदीप खामकर याने वैयक्तिक किंवा राजकीय प्रसिद्धी मिळविण्यासाठी पातळी सोडून केलेली टीकाटिपणी ही निंदनीय आहे. या घटनेचा शहर भाजप जाहीर निषेध करत आहे.
भाजपचे प्रदेशध्यक्ष असलेल्या आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या संदीप खामकर विरुद्ध त्वरित गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी. जेणे करून कोणीही कोणत्याही राजकीय व्यक्तीबद्दल असे अक्षेपार्ह मजकूरात टिप्पणी करण्याची हिंमत करणार नाही, अशी मागणी शहर भाजपाचे जिल्ह्यध्यक्ष महेंद्र गंधे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदना द्वारे केली.
या घटनेच्या निषेधार्थ शहर भाजपच्या शिष्ठमंडळाने जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांना निवेदन देवून वरील मागणी केली. यावेळी शहराध्यक्ष महेंद्र गंधे, शहर सरचिटणीस तुषार पोटे, उपाध्यक्ष संतोष गांधी, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, चंद्रकांत पाटोळे, सुमित बटोळे, रियाज कुरेशी, रामदास आंधळे, सुभाष आल्हाट, नितीन दिनकर, बंटी लांडगे, बाबसाहेब सानप, रोहन शेलार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी ताबडतोब सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.
0 टिप्पण्या