लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेतकरी व सभासदांना केंद्रीभूत मानून अहमदनगर जिल्हा बँक कार्यरत आहे. तिर्थरूप भाऊसाहेब थोरात यांनी दीर्घकाळ या बँकेचे अध्यक्षपद भूषवले. एक विचाराने ही संस्था चालवली जाते, निर्णय घेताना सर्व संचालक एकत्रित बसतात आणि संस्थेच्या हिताचा आणि सभासदांच्या फायद्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळेच ही संस्था विद्यमान स्पर्धेच्या युगातही टिकून आहे. असे प्रतिपादन माजी मंत्री व ज्येष्ठ सहकार नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
शुक्रवार दि. १६ रोजी बँकेच्या मुख्यालय येथे आयोजित सर्व साधारण सभेत उपस्थित संचालकांना मार्गदर्नशन करताना ते बोलत होते. ते पुढें म्हणाले, नगर जिल्ह्याच्या विकासात जिल्हा बँकेचे योगदान मोठे आहे, शेतकऱ्यांच्या जीवनात जे परिवर्तन झाले ते जिल्हा बँकेमुळे. 65 वर्षांची यशस्वी वाटचाल सचोटी आणि चांगल्या कारभारामुळे हे शक्य झाले आहे. आर्थिक शिस्त, विचारपूर्वक राबविलेल्या धोरणात्मक बाबी व शेतकरी हिताचा विचार केला, त्यामुळेच राज्यात आणि आशिया खंडात ही बँक आपला लॉकिक आजही टिकवून आहे, असे अभिमानाने त्यांनी सांगितले.
संस्थेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार डॉ सुधीर तांबे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार नरेंद्र घुले आदींसह संस्थेचे संचालक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या