Ticker

6/Breaking/ticker-posts

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

 





 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर:-

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिये अंतर्गत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी व संबंधित शैक्षणिक संस्थांनी जाती प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे विहीत मुदतीत सादर करावेत. 


सीईटी, जेईई, नीट, गेट, नाटा तसेच पदविका अभ्यासक्रम पुर्ण करुन पदवी प्रवेशासाठी व्यावसायीक अभ्यासक्रम प्रक्रिये अंतर्गत आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. ज्यांनी अद्याप वैधता प्रमाणपत्रासाठी अहमदनगर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात अर्ज दाखल केलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन तात्काळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत.


तसेच त्याची एक प्रत १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, अहमदनगर या कार्यालयाकडे सादर करावी असे आवाहन अहमदनगर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य तथा उपायुक्त यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या