Ticker

6/Breaking/ticker-posts

पाऊलबुधे फार्मसीच्या विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे कंपनीत निवड




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)   

नगर - येथील सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ. ना. ज. पाऊलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील तेजस्वनी कोहोकडे व आकाश ताके या विद्यार्थ्यांची कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्युद्वारे निवड झाल्याची माहिती बी. फार्मचे प्राचार्य डॉ. एन. वाय. जाधव व डी. फार्मच्या प्राचार्या ए. के. चव्हाण यांनी दिली.


याबाबत अधिक माहिती देतांना प्राचार्या चव्हाण यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षापासून फार्मसीच्या दोन्ही शाखांमधून उत्तीर्ण वि्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत.  


महाविद्यालयाच्या ट्रेनिंग प्लेसमेंट विभागामार्फत यंदा 10 सप्टेंबर 2022 रोजी कॅम्पस इंटरव्ह्यु घेण्यात आल्या. यामध्ये तेजस्वनी कोहोकडे व आकाश ताके या दोघांची कंन्सेप्ट फार्मासिटीकल, औरंगाबाद या कंपनीत निवड झाली. 


या निवडीबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विनय पाऊलबुधे, बी.एड्. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. रेखाराणी खुराणा, प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. डि.ए.पवळे, प्रा.एम.एस.शेख तसेच संस्थेचे पदाधिकारी व कर्मचार्यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या