Ticker

6/Breaking/ticker-posts

भविष्यात पाण्यासाठी मोठा लढा उभारणार :- प्रतापराव ढाकणे

 




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

बोधेगाव/टाकळी मानूर 

कार्य क्षेत्रातील ६२ गांवातील शेतीच्या शास्वत पाण्यासाठी भविष्यात संघर्ष करून मोठा लढा उभा करणार असल्याची घोषणा संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. प्रतापराव ढाकणे यांनी केली. 


बुधवार दि. २८ रोजी दुपारी संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची ३३ वी वार्षिक सर्वसाधरण सभा कारखाना कार्यस्थळावर खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली त्यावेळी सभेच्या अध्यक्ष पदावरून ऍड प्रतापराव ढाकणे हे बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश घनवट, जेष्ट संचालक सुरेशराव होळकर, बापुराव घोडके, विठ्ठलराव अभंग, भाऊसाहेब मुंडे, रणजित घुगे, बाळासाहेब शिरसाठ, सुभाष खंडागळे, सतीश गव्हाणे, बाळासाहेब फुंदे, तुषार वैद्य, मुख्य प्रशासन अधिकारी पोपट केदार, श्रीमंत गव्हाणे, शेषराव बटुळे, मुख्य लेखा अधिकारी तिर्थराज घुंगरड, चीफ इंजिनिअर प्रविण काळूसे, चीफ केमिस्ट पुंडलिक सांगळे, शेतकी अधिकारी अभिमन्यू विखे, परचेस ऑफिसर तुकाराम वारे, सिव्हिल इंजिनिअर संजय चेमटे, विक्रम केदार आंबारास दहिफळे, सामाजिक कार्यकर्ते शहाजी जाधव इत्यादी सह सर्व संचालक व्यासपिठावर उपस्थीत होते.


 पुढे बोलतांना ऍड ढाकणे म्हणाले की, केदारेश्वर नव्हता त्यावेळी या भागातील शेतकऱ्यांचा ऊस बांदावर किंवा रस्त्यावर पडायचा शेतकऱ्यांना कोणी वाली नव्हता. सहकार चळवळीमुळे ग्रामिण भागात सुबकत्ता आली शेतकरी सुधारला पण सहकाराचे जेवढे कौतूक झाले तेवढेच दोषही आहेत नको असलेल्या शक्ती आणी ताकत सहकारात घुसल्या चुकीच्या आणी भावनात्मक निर्णयामुळे अनेक सहकारी साखर कारखाने देशोधडीला लागले. सहकारामुळे शेतकऱ्यांना किती फायदा झाला हा संशोधनाचा विषय आहे. राजकारणातुन समाजकारण करुन सर्वसामान्याना न्याय मिळण्यासाठी लढा दयावा लागतो आम्ही समाजकारणाच्या नावाखाली राजकारण करीत नाहीत तर सर्वसामान्यांसाठी संघर्ष करून त्यांना न्याय मिळावा यासाठी संघर्षाच्या भूमिकेतून काम करत आहोत शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करण्याची वेळ आता आली आहे असेही ढाकणे म्हणाले. 


यावेळी तज्ज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे यांनी मागील गळती हंगाम यशश्वी केल्या बद्दल सर्वांना धन्यवाद दिले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनीकुमार घोळवे यांनी लवकरच इथेनॉल प्रकल्प सुरु होवून इतर प्रकल्पाची माहिती दिली. सभासद सर्जेराव दहिफळे, आयुब शेख , प्रमोद विखे, भाऊसाहेब पोटभरे , नामदेव कसाळ यांनी प्रश्न मांडले. नोटीस वाचन कार्यकारी संचालक रमेश गर्जे यांनी केले .सुत्रसंचालन शरद सोनवणे तर आभार डॉ. प्रकाश घनवट यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या