Ticker

6/Breaking/ticker-posts

नगरमधील महिलांची श्री गणेशाला अनोखी भाववंदना

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर,: गणेशोत्सवाचे उत्साही वातावरण ,ढोल ताशाच्या तालावर थिरकणारी  पाऊले आणि हा लोका सोहळा पाहण्यासाठी जमलेले हजारो नगरकर , असा नगरसेवक ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरासमोरील आजचा नजारा स्मरणीय होता.


येथील जिजाऊ फाउंडेशन विषशत: महिलांचा व्यक्तिमत्व विकासशारीरिक आणि मानसिक आरोग्य तसेच कुटुंब स्वास्थ्य या विषयांवर मागील ४  वर्षांपासून कार्यरत आहे. १८ ते  ८० वर्ष वयोगटातील ४००   महिला आणि मुली फाउंडेशनच्या हास्य योगा , प्राणायाम , स्ट्रेचिंग ,समुपदेशन  आणि इतर उपक्रमांचा दैनंदिन लाभ घेतात.


मार्केट यार्ड परिसरातील सिताबन लॉन येथे जिजाऊ फाउंडेशनचे दैनंदिन कार्यक्रम पहाटे पासून सुरू होतात.  शरीराच्या प्रत्येक भागाला ताण देऊन शरारिक स्वास्थ्य राखले जाते.  तसेच मानसिक आरोग्यासाठी प्राणायाम आणि ध्यान घेतले जाते. आनंदी जीवनासाठी हास्य योगा  घेतला जातो. सर्व महिलांची नियमितपणे रक्तातील साखर आणि हिमोग्लोबीन  आणि इतर आजारांची तपासणी शिबिरे , तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित केले जाते.

सर्व राष्ट्रीय आणि सर्व धार्मिक सण - उत्सव महिला सामूहिक साजऱ्या करतात. नित्य उपक्रमांची सुरुवात पहाटे राष्ट्रगीताने होते. सहली , दर्जेदार चित्रपटांचे प्रदर्शन , प्रत्येक आठवड्यात  लेझीम सराव आणि रंजक  व्यायाम प्रकार घेतले जातात. सर्व महिलांना तंत्रज्ञानाचा वापर जिजाऊ फाउंडेशनने शिकवला. त्यामुळे ८०  वर्षांच्या  वृद्ध सदस्य सुद्धा झूम  मीटिंग आणि इतर माध्यमात स्वतःच  मोबाईल संचालित करून सहभागी होतात. व्हाट्सअप गट आणि फेसबुक वर स्वतःच आत्मविश्वासाने व्यक्त होतात. एकमेकांची सुखदुःख वाटून घेणारा जिजाऊ फाउंडेशन हा एक बृहपरिवार झाल्याचे संस्थापिका सौ. मनीषा संजय गुगळे आणि आरोही संस्थेच्या नृत्यदिग्दर्शिका  श्रद्धा देडगावकर यांनी आज श्री गणेश मानवंदना कार्यक्रमात सांगितले.


संगीत - नृत्य ढोल लेझीम अभिवादनात  १२५ महिलांनी  सहभाग घेतला. विशाल गणपती ट्रस्ट चे विश्वस्त पंडितराव खरपुडेअशोक कानडेॲड.अभय आगरकरसचिव अशोक कलाने , खजिनदार पांडुरंग ननवरे ,विश्वस्त बापूसाहेब काळेप्रा. माणिकराव विधातेसहननाथ महाराजआदींनी ट्रस्ट तर्फे उपक्रमात सहभागी जिजाऊ फाउंडेशन सदस्यांचा  गौरव केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या