लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पाथर्डी (टाकळी मानूर) दि २३ - भाजपचे दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या सन २०११ सालच्या दौऱ्यावेळी विरोधकांनी कटकारस्थान रचून दाखल केलेल्या धादांत खोट्या गुन्ह्यातून राष्ट्रवादीचे नेते अॕड. प्रतापराव ढाकणे व इतर सात जणांची जिल्हा न्यायाधीश अहमदनगर यांनी आज निदोॕष मुक्तता केली.
सन २०११ साली पाथडीॕ तालुका व शहरात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा दौरा तत्कालीन भाजपचे जिल्हाध्यक्ष अॕड. प्रतापराव ढाकणे यांनी विकासकामे शुभारंभ करणेसाठी आयोजित केला होता.या दौऱ्यात पक्षातीलच काही विरोधकांनी ढाकणे यांच्यासह त्यांच्या काही समॕथकांविरोधात कटकारस्थान रचत वाद घातला. व भा.द.वि.कलम 307,324,326,324 व आमॕ अॕक्ट नुसार खोटे गुन्हे पाथडीॕ पोलिस ठाण्यात दाखल केले.
वास्तविक यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नव्हते मात्र विरोधकांच्या सांगण्यावरून स्थानिक यंत्रणांनी विनाकारण संबंधित आरोपपत्र न्यायालयीन लढाईसाठी सादर केले. जे तब्बल अकरा वर्षे चालले. त्यासंबंधी आज जिल्हा न्यायालयात न्यायाधीश एन.आर.नाईवाडे यांच्यासमोर अंतिम सुनावणी झाली.
यामध्ये अॕड.प्रतापराव ढाकणे, बाजार समितीचे माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट, अमोल विश्वनाथ बडे, अशोक शिरसाठ, राजेंद्र शिरसाठ, संभाजी ढाकणे व दीपक जायभाय यांची न्यायालयाने निदोॕष मुक्तता केली.
ढाकणे समथॕकांनी या निर्णयाचे शेवगाव व पाथडीॕ तालुक्यात स्वागत केले. अॕड.विश्वास आठरे,अॕड.सतिष गूगळे व अॕड. रघुनाथ मुरूमकर यांनी काम पाहिले.
0 टिप्पण्या