लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क
बोधेगाव( ता. शेवगाव):- दि३० तालुक्यातील बोधेगांव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन अनिल घोरतळे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या प्रांगणात झाली असून सभेमध्ये सोसायटीने मागील पंचवार्षिक मध्ये शॉपिंग सेंटर च्या गाळ्याचे केलेले बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप या सभेमध्ये सभासद व शेतकरी यांनी केल्याने ही सभा काही वेळ वादळी ठरली.
परंतु अर्धवट बांधकाम झालेल्या या गाळ्यासाठी घेतलेली अनामत रक्कम ही जास्त प्रमाणात घेतल्याने याची चौकशी करावी आणी गाळे हे कर्जदार सभासदा व्यतिरिक्त इतरांना देऊ नये. असाही सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला , निकृष्ट दर्जाच्या झालेल्या गाळ्याची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करू असेही चेअरमन अनिल घोरतळे यांनी सांगितले.
यावेळी सेवा संस्थेचे चेअरमन अनिल घोरतळे ,व्हाईस चेअरमन प्रसाद पवार, सचिव अर्जुन राजपुरे, रामजी अंधारे , भाऊराव भोंगळे , रमेश गरजे, विष्णू वारकड, कुंडलिक भाऊ घोरतळे, प, ल , तांबे , माणिक गरजे , सतीश चव्हाण , झांबरे भाऊसाहेब ,राजेंद्र बनसोडे, दीपक गायकवाड , देवढे मामा ,आदींसह सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
0 टिप्पण्या