आचार्यश्रीच्या सानिध्यात मानचिन्ह स्वीकारताना अशोक (बाबुशेठ) बोरा यांच्या सोबत नगर येथील संजय चोपडा व विजय गुगळे
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर : परम श्रद्धेय ध्यानयोगी आचार्य सम्राट परम पूज्य शिवमुनी जी म.सा यांची ८१ वी जन्म जयंती सुरत येथे असंख्य भक्तगणांच्या मोठ्या उत्साहपूर्ण व आनंदमय सानिध्यात संपन्न झाली. जम्मूकाश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचे संपूर्ण भारतातून विविध शहरातून भक्तगण मोठ्या संख्येने सदर ठिकाणी उपस्थित होते.
आचार्य भगवंतांच्या या जन्मदिनी कोणालाही आमंत्रण अगर समाज माध्यमाच्या माध्यमातून कोणतीही सूचना करण्यात आलेली नव्हती. तरीदेखील त्यांच्या तप व योग साधनेमुळे तसेच ते अध्यात्मयोगी असल्याने भक्तगणांमध्ये त्यांच्याविषयी तीर्थ स्वरूपाचे स्थान निर्माण झाल्याचे दिसून आले व त्यामुळेच त्यांच्या जन्मदिनी भक्तांचा जनसागर उमडला. राष्ट्रसंत आचार्य भगवंत परम पूज्य श्री आनंदऋषीजी म.सा यांनी पुणे येथे त्यांना त्यांचा आशीर्वाद देत त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. आचार्यश्रींचा सदर निर्णय स्थानकवासी समाजाच्या दृष्टीने नक्कीच सार्थक झाले असे सर्व भक्तगनांमध्ये चर्चा होती. या प्रसंगी आचार्यश्रींजींना अनेक शहरातून चातुर्मास करीता विविध श्रावक संघाद्वारे त्यांच्या चरणी आदरपूर्वक विनंती करण्यात आली परंतु भावपुर्वक श्रवक संघाने केलेल्या विनंती ची दखल घेत आचार्यश्रीनी आपल्या संबोधनात मला धान्ययोग, साधना व तपमध्ये विलीन राहण्याचा मनपूर्वक मानस असल्याने सध्या मला कुठेही चातुर्मास करण्याची इच्छा नसल्याचे उपस्थित सर्व भक्तगणांना समोर बोलून दाखवले व सर्वानाआवाहन केले की प्रत्येक श्रावकाने २४ तासापैकी किमान रोज ५ मिनिट तरी योगसाधना करावी त्यामुळे आत्मकल्यानाचे मार्ग प्रशस्त होईल. त्या करिता सर्व शरहातून ध्यानसाधना शिबिराचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जावे. या धर्तीवर विशेषतह नाशिक सरसवती केंद्र दिल्ली, जम्मू तसेच विविध शरहातून सातत्याने ध्यान शिबिराचे आयोजन होत आहेत. भगवंतानी या वेळी देशभरातून आलेल्या भक्तगणांना प्रवचन देत त्यांच्या जन्म दिनानिमित्त शुभ आशीर्वाद व शुभकामना दिल्या.
या प्रसंगी राष्ट्रपतींच्या हस्ते नुकतेच नूतन महावीर हॉस्पिटल चे शिलान्यास झाले त्याचे अध्यक्ष श्री. सुभाष जी ओसवाल यांनी अशोक (बाबुसेठ) बोरा यांना आचार्यश्रींच्या सानिध्यात मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला. या प्रसंगी अहमदनगर येथून अशोक (बाबुसेठ) बोरा, ॲड. अमृत मुथा, संजय चोपडा, सुमतीलाल कोठारी, विजय गुगळे, प्रमोद मुनोत नेवासकर, किशोर पितळे, रमेश सोनीमंडलेचा, रमेश पितळे, ॲड. लता बोरा, पवन कटारिया, रोशन चोरडिया, शेटिया आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या