लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : शेवगाव तहसील कार्यालयातील गौण खनिज विभागाचा लिपिक हरेश्वर सानप
यास (दिं.२७ जुलै २०२२)नाशिकच्या एसीबी पथकाने ५० हजार रुपयांच्या लाचेच्या
मागणीवरून गुन्हा दाखल केला. ही घटना ताजी असतानाच याच विभागाचा दुसरा लिपिक मनोज
जाधव एसीबीच्या गळाला लागला असून पाचशे रुपयाची लाच मागितल्याच्या आरोपावरून
शेवगाव पोलीस स्टेशनला मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला तसेच दुसऱ्या एका घटनेत
पोलिसांनी लॉजवरील जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत गणेश वावरे नामक तलाठी
अडकले.त्यामुळे शेवगाव तहसील कार्यालयाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर आली आहेत.शेवगाव
तहसील कार्यालयात नेमकं चाललं तरी काय ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्यास
नवल वाटू नये.
शेवगाव तहसील कार्यालय या व इतर कारणांमुळे गेल्या अनेक वर्षापासून सततच चर्चेत राहिले आहे. कार्यालयाच्या प्रत्येक विभागात चिरीमिरी घेतल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. मात्र,तहसीलदार हातावर हात ठेवून फुकटचा तमाशा पाहत आहेत.आज सर्वाधिक भ्रष्टाचार पुरवठा विभागात सुरू आहे. त्या खालोखाल गौण खनिज विभागाचा क्रमांक लागतो. शेवगाव व ग्रामीण भागातील निवडक सजेतील तलाठी जनतेची सर्रासपणे आर्थिक लूट करत आहेत.रस्ते केसचा टेबल सांभाळणारा कर्मचारी मालामाल झाला असून तो स्वतःला तहसीलदार समजतो.तर,अन्य एका कर्मचाऱ्याची केबिन तहसीलदारांना लाजविणारी आहे.
0 टिप्पण्या