Ticker

6/Breaking/ticker-posts

'प्रहार'ने सुचविलेले रस्ते दुरुस्ती करण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांचे आदेश..



 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)      

अहमदनगर - दि. १६ सप्टेंबर

प्रहारने सुचविलेले सर्व रस्ते तातडीने दुरुस्त करण्याचे रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी आदेश दिले.  प्रहारच्या मागणीची दखल न घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी बैठकीत डॉ. भोसले यांनी चांगलेच फैलावर घेतले.

     या बैठकीत जिल्हाधिकारी यांचे सकारात्मक  निर्णयामुळे प्रहार चे सा. बा. समोरील सदबुद्धी सत्यनारायण जागरण गोंधळ तूर्तास स्थगित केले असल्याचे प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांनी सांगितले.

     जिल्ह्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि त्यावर होणारे अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने वारंवार विनंती अर्ज करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दखल घेत नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहमदनगर येथील कार्यालयाच्या समोर सदबुद्धी सत्यनारायण व जागरण गोंधळ आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष अभिजीत  पोटे यांनी दिला होता.

      

जिल्हा रस्ते सुरक्षा समिती बैठकीस   प्रहारचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अप्पासाहेब ढूस, जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख, प्रहार किसान आर्मीचे प्रमुख रघुनाथ आरगडे, रमेश भालके, नानासाहेब तागड, पाथरवाल्याचे सरपंच दत्तात्रय खाटीक आदी  कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

      या बैठकीमध्ये बैठकीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कुलकर्णी यांनी प्रहारच्या निवेदनावर तात्काळ दखल न घेतल्याबद्दल ताशेरे ओढले. 

      पुढे बोलताना जिल्हाधिकारी  म्हणाले की जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांपैकी नगर -मनमाड रस्त्याचे टेंडर निघाले असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे त्याबद्दल काल मंत्रालयात बैठक संपन्न झाली असून एक महिन्यात हा प्रश्न मार्गी लागणार आहे तसेच पाथर्डीचा प्रस्तावही एक महिन्यात मार्गी लागेल प्रहारच्या तक्रारींवर तात्काळ निर्णय करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन रोड सेफ्टी चे सर्व नियम पाळण्यास सांगितले तसेच गॅस पाईपलाईन कामाची चौकशी करावी. रस्त्याचे डिव्हायडर फोडल्याबद्दल संबंधितांवर तत्काळ कारवाईचे आदेश  दिले.

     या बैठकीमध्ये देवळाली प्रवरा ते टाकळीमिया या रस्त्यासह  प्रहारच्या मागणीतील सर्व रस्त्यांच्या बाबत तातडीने बैठक घेऊन निर्णय करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाध्यक्षांनी राहता श्रीरामपूर तालुक्यातील सीमेवरील वाकडी फाटा ते गणेश नगर एकरुखे हा रस्ता जिल्हा परिषदे कडून सार्वजनिक बांधकाम   विभागाकडे वर्ग केला जात नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली नेवासा तालुक्यातील एकूण पंधरा रस्त्यावर वृक्षारोपण केल्यानंतर खड्डे बुजवण्यास सुरुवात केली असल्याची बाब सुरक्षा बैठकीत समोर मांडली.

     

 बाभळेश्वर-श्रीरामपूर-नेवासा रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत संबंधित श्रीरामपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी नितीन गुजरे यांना रस्त्याच्या चालू असलेल्या निकृष्ट कामाची बाब श्री नवाज शेख प्रहारचे जिल्हा कार्याध्यक्ष  ढूस यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. या कऱ्यबहिबद्धल कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या