लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर - मंगल भुजबळ यांची आखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या सहसमन्वयक पदी व राजस्थान प्रदेश कॉंग्रेसच्या सहप्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र कॉंग्रेस पक्ष्याच्या वतीने जाहीर नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
कॉंग्रेस कार्यकर्ता शिबिराचे पश्चिम महाराष्ट्र चे पुणे येथे १७ सप्टेंबरला कॉंग्रेस भवन येथे व उत्तर महाराष्ट्रचे नाशिक येथे १८ सप्टेंबरला होत असून मंगल भुजबळ यांचा यावेळी कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री हरियाणाचे कॅप्टन अजयसिंग यादव यांच्या हस्ते व कॉंग्रेस प्रदेशाअध्यक्ष . आमदार नाना पटोले आणी कॉंग्रेस विधिमंडळ गटनेते तथा माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात या मान्यवरांसह कॉंग्रेसच्या महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल, राहूल यादव ,शीतल चौधरी, कॉंग्रेस ओबीसी प्रदेशाअध्यक्ष भानुदास माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार सोहळा होणार आहे.
हा कार्यक्रम नाशिकला १८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ,धनलक्ष्मी बँक्वेट हॉल ,निलगिरी बागेसमोर , औरंगाबाद रोड ,पंचवटी येथे आयोजित केला असून उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे सर्व कॉंग्रेसचे पदाधिकारी ,कार्यकर्ते सदरील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
कॉंग्रेस पक्ष कार्यकर्त्यांसह भूजबळ यांच्या हितचिंतकांनी व सामाजिक संघटनांनी सदरील कार्यक्रमास उपस्थित राहवे, असे आवाहन संयजकांनी केले आहे .
0 टिप्पण्या